आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षण हक्क कायद्यांतर्गत समाजातील दुर्बल घटकांसाठी २५ टक्के प्रवेश देण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातून सहा दिवसांत २ हजार ६८३ अर्ज आले आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १७ मार्च आहे. तोपर्यंत आणखी अर्ज येतील, असा शिक्षण विभागाचा अंदाज आहे. प्रतिकूल सामाजिक किंवा आर्थिक स्थितीमुळे मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शिक्षण हक्क कायदा (आरटीई) आणला गेला. त्याअंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के प्रवेशासाठी जागा राखीव असतात.
शालेय शिक्षण विभागातर्फे आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अर्ज आॅनलाइन करायचे आहेत. यंदा आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील २९५ शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांत २३२० जागा आहेत. शहरात १७ शाळा असून ३२४ जागा आहेत. जिल्ह्यात २६८३ विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज सादर झाले आहेत. १७ मार्च रोजी रात्री बारा वाजेपर्यंत पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा असून अर्ज भरताना अडचणी आल्यास शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण विभागाच्या माध्यमातून केले आहे.
यंदा प्रवेशासाठी राज्य स्तरावरून एकच सोडत जाहीर होईल. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे एकच अर्ज व्यवस्थित भरावा लागणार आहे. पालकांना दहा शाळा पर्याय म्हणून निवडता येणार आहेत. अर्जप्रक्रिया ऑनलाइनच करायची आहे, असे िवभागाने स्पष्ट केले.
आरटीई प्रवेशासाठी सात दिवसांत अडीच हजाराहून अधिक जणांनी अर्ज दाखल केलेले आहेत. ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाकडून दोन वेबसाईट कार्यरत केल्या आहेत. आता वेबसाइटवर लोड येणार नाही. तसेच १७ मार्चपर्यंत मुदत असल्यामुळे प्रवेश अर्ज दाखल करण्यापासून कोणीच वंचित राहणार नाही.’’ संजय जावीर, शिक्षणाधिकारी
अर्ज भरण्यासाठी आणखी एक संकेतस्थळ शिक्षण हक्क कायद्या तील २५ टक्केअंतर्गत नोंदणी करण्यास १ मार्चपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही अर्ज आला नव्हता. मात्र दुसऱ्या दिवसापासून नोंदणीसाठी पालकांनी गर्दी केल्याने संकेतस्थळ हँग होऊ लागले होते. पालकांनी लेखी तक्रार केल्यानंतर शिक्षण विभाग व एनआयसी विभागाने आणखी एक नव्याने संकेतस्थळ सुरू केले आहे. https://rte25admissi on. maharashtra. gov.in/adm_portal /Users/rteindex या संकेतस्थळावरूनही पालकांना अर्ज करता येणार आहे. संकेतस्थळ मंद झाल्यास काही वेळाने प्रयत्न करता येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.