आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार शहाजी पाटील यांची माहिती‎:मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून‎ सांगोल्यासाठी 29 कोटी मंजूर‎

सांगोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगोला मतदारसंघातील ३५ किलोमीटर रस्त्यांच्या सुधारणेसाठी २९‎ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. सदर कामांची पाच वर्षे‎ नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी एक कोटी ८७ लाख ८७ हजार‎ रुपये निधीची तरतूद केली असल्याची माहिती आमदार शहाजी पाटील‎ यांनी दिली. मिळालेल्या २९ कोटी निधीतून पंढरपूर तालुक्यातील एक व‎ सांगोला तालुक्यातील पाच असे एकूण सहा रस्ते आहेत.‎ रस्ता सुधारण्यासाठी मिळालेल्या निधीतून गार्डी (ता. पंढरपूर) ते मोरे‎ वस्ती रस्ता (४ किमी, इटकी (ता. सांगोला) ते खांडेकर वस्ती राजेवाडी‎ साखर कारखाना रस्ता (४ किमी), कोळा (ता.सांगोला) ते तिप्पेहळी ते‎ घोरपडी तालुका हद्द (३ किमी), वाढेगाव (ता.सांगोला) ते राजापूर रस्ता‎ (४ किमी), खवासपूर (ता.सांगोला) ते उंबरगाव रस्ता, सांगोला ते‎ अजनाळे, बलवडी शिंदे वस्ती रस्ता ही कामे होणार आहेत. या‎ रस्तेकामासाठी २९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्याच्या‎ पाच वर्षाच्या देखभाल दुरुस्तीसाठी १ कोटी ८७ लाख ८७ हजार रुपये‎ निधीची तरतूद केलेली आहे.‎ या भागातील ३५ किलोमीटर लांबीचे रस्ते मजबुरीकरण होणार आहेत,‎ अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...