आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी राज्य सरकारने तीन कोटी दिले आहेत. महाराष्ट्रातील शैक्षणिक व सामाजिक उपक्रमातून बसवतत्त्व आणि वचन साहित्याचे संशोधन होणार आहे. लिंगायत समाजातील विविध संघटनांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन कुलगुरू डाॅ. मृणालिनी फडणवीस यांनी अध्यासनाचा प्रस्ताव सरकारला सादर केला होता. त्यानुसार सरकारने मंजुरी दिली होती. निधी मंजुरीसाठी महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीने पाठपुरावा केला. समितीचे अध्यक्ष डाॅ. बसवराज बगले यांनी विद्यापीठातील अध्यासन विभागास भेट देऊन या केंद्राच्या उपक्रमाची माहिती घेतली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही निवेदन दिले होते. शिवाय अनेक बसवप्रेमी संघटनांनी पत्रव्यवहार केला होता.
बसवतत्त्व साहित्य संशोधन सरकारने दिलेले तीन कोटी रुपये बँकेत ठेवणार आहेत. त्याच्या व्याजाच्या रकमेतून महात्मा बसवेश्वरांचे वचन साहित्य, बसव विचार संशोधन, शालेय पाठ्यक्रमातील सहभाग, प्रशिक्षण कार्यक्रम, सल्ला व समुपदेशन प्रकल्प, बसव साहित्यिकांच्या अभ्यासासाठी एमफील आणि पीएचडीचे प्रबंधलेखन आदी उपक्रम राबवण्यात येतील. केंद्रासाठी इमारत, संचालक, कर्मचारी द्या, अशी मागणी डाॅ. बसवराज बगले यांनी केली.

Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.