आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकअपने दिली धडक:ब्रह्मपुरीजवळ पिकअपने उडवल्याने तिघांचा मृत्यू

मंगळवेढा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवेढा ते सोलापूर महामार्गावर मंगळवारी ब्रह्मपुरीजवळ रस्त्याकडेला बोलत उभे राहिलेल्या चौघांना पिकअपने धडक दिली. यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी आहे. ब्रह्मपुरीजवळील पेट्रोल पंपाजवळ पिकअपने धडक दिली. यात सोपान भालेराव (५०), जयश्री सोपान भालेराव (४५, रा. नजीक पिंपरी), कस्तुरा साठे (४० रा. हिरज) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रज्वली भालेराव (५) गंभीर जखमी आहे. भालेराव हे मंगळवारी कासेगाव येथील यल्लामा जत्रेला गेले होते. सायंकाळी लेकीच्या घरून नजीक पिंपरीकडे जाताना मल्हारी पाराधे यांच्यासोबत सासरे सोपान, सासू जयश्री व प्रज्वलित, मावस सासू कस्तुरा साठे हे मंगळवेढा रस्त्यावर पंपाजवळ रस्त्याच्या कडेला बोलत उभे असताना पिकअपने ठोकरले.

बातम्या आणखी आहेत...