आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमीन घोटाळा:एका जमिनीचे झाले 3 ते 5 वेळा व्यवहार; मालक म्हणतात- शेतकऱ्यांकडून घेतली, हक्क आमचा

सोलापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा जिल्ह्यातील काेयना प्रकल्पग्रस्तांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळाला नाही. पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकत्रित माहिती संकलित करण्यात आली. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अद्यापही पात्र प्रकल्पग्रस्त शेतकरी वंचित राहिले. निवाड्यात नाव नसलेल्या, एकाच प्रकल्पग्रस्तास एकाहून अधिक वेळा जमिनीचे वाटप करणे या बाबी समोर आल्या. आतापर्यंत १५ हजार हेक्टरहून अधिक जमिनीचे वाटप करण्यात आले असले तरी कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना किती जमिनीचे वाटप करण्यात आले, याची आकडेवारीच समोर आली नाही. सोलापूर जिल्ह्यात प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या ४५०० हेक्टर जमिनीपैकी ८५ टक्क्यांहून अधिक जमिनीचे वाटप करण्यात आलेे. सध्या जमीन ज्या शेतकऱ्यांच्या नावे आहे, त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला असता काहींनी थेट प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून तर काहींनी तिसऱ्या व्यक्तीकडून जमीन खरेदी केली आहे. एका जमिनीचे आतापर्यंत कमीत कमी दोन तर जास्तीत जास्त पाचहून अधिक व्यवहार झाले आहेत. मूळ प्रकल्पग्रस्तांकडे असलेल्या जमीन मालकांची संख्या ५ ते १० टक्क्यांपर्यंत असल्याचे पुनर्वसन कार्यालयाकडून सांगण्यात आले.

काय म्हणतात सध्याच्या जमिनीचे मालक
मूळ प्रकल्पग्रस्त असल्याने खरेदी
खरेदी केली आहे. सर्व कागदपत्रे तपासणी करूनच आम्ही जमीन घेतली आहे. त्यांनी स्वत:हून आमच्यासोबत व्यवहार केला आहे. मूळ प्रकल्पग्रस्त असल्याने आम्ही जमिनीची खरेदी केली आहे. उताऱ्यावर सध्या आमचे नाव आहे.'
- अर्जुन देवमारे, कासेगाव ता. पंढरपूर

उताऱ्यावर आमचे नाव लावण्यात आले
^आम्ही अरबळी येथील मनीषा नवनाथ डोंगरे यांच्या मालकीची २ एकर जमीन २०१७ मध्ये खरेदी केली आहे. त्यांनी कदम नावाच्या व्यक्तीकडून जमिनीची खरेदी केल्याचे सांगितले आहे. आम्ही आमचे म्हणणे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. उताऱ्यावर आमचे नाव लावण्यात आले आहे.
- संगीता सिद्धेश्वर मस्के, अरबळी, ता. मोहोळ

पात्र-अपात्र कोण? रेकॉर्ड नाही
मध्यंतरीच्या कालावधीत एजंट घुसल्याने अपात्र लोकांना जमीन वाटप झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. जमिनी वाटप झाल्या असल्या तरी पात्र अन् अपात्र कोण, याची माहितीच उपलब्ध नाही. ते तपासण्याचे काम हाती घेतले आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल.' - डॉ. भारत पाटणकर, नेते, श्रमिक मुक्ती दल

बातम्या आणखी आहेत...