आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:अल्पवयीन मुलीचा विनयभंग‎ प्रकरणात 3 वर्षे सक्तमजुरी‎

सोलापूर‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका‎ व्यक्तीला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा अतिरिक्त जिल्हा‎ व सत्र न्यायाधीश कविता शिरभाते यांनी सुनावली. देवेंद्र‎ शांतप्पा नागुरे (वय ५५, रा. अक्कलकोट) याला शिक्षा‎ झाली. हा प्रकार २८ डिसेंबर २०१५ रोजी घडला होता.‎ मुलगी शाळेत गेल्यानंतर मधल्या सुटीत तिला देवेंद्र‎ नागुरे याने दहा रुपयांचे आमिष दाखवून काही अंतरावर‎ नेले. विनयभंग केला. फिर्याद दिल्यानंतर अक्कलकोटचे‎ तत्कालीन उपविभागीय अधिकारी कृष्णकांत उपाध्याय‎ यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते.

एकूण‎ सहा साक्षीदार तपासले. पालकांची साक्ष महत्त्वाची‎ ठरली. मुलीची आई साक्ष देताना त्यांना कन्नड‎ भाषेशिवाय अन्य भाषा येत नसल्यामुळे दुभाषकाची मदत‎ दिली . हा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे ३ वर्षे सक्तमजुरी व पाच‎ हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली. दंडाची रक्कम पीडित‎ मुलीला देण्याचे आदेश आहेत. सरकार तर्फे प्रकाश जन्नू,‎ शीतल डोके, आरोपीतर्फे पी. बी. लोंढे पाटील या‎ वकिलांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून हवालदार‎ अजित सुरवसे यांनी मदत केली.‎

बातम्या आणखी आहेत...