आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेवदर्शन करून जत येथून बुलेटवरून खर्डीला (ता. पंढरपूर) परत येणाऱ्या तिघांचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाला. सोनंद (ता. सांगोला) गावाजवळ शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात झाला. किरण सुधाकर गुजले (वय २३), अक्षय अण्णासाहेब मलमे पाटील (वय २३, दोघेही रा. कोसारी, ता. जत) आणि अजित शशिकांत मंडले (वय २३, रा. नेलकरंजी, ता. आटपाडी) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही सध्या खर्डी येथे राहत होते.
जत येथील देवीचे दर्शन घेऊन बुलेटवरून (एमएच १३ बीटी - ४९३६) परत येत असताना दुपारी बाराच्या सुमारास सोनंद येथील खडीक्रशरजवळ समोरून येणाऱ्या कंटेनरची (एमएच ४६ एजी - १०८६) बुलेटला धडक बसली. यात बुलेट चालवणारा किरण गुजले जागीच ठार झाला. सांगोला येथे उपचारासाठी नेताना अक्षय मलमे पाटील, अजित मंडले यांचा मृत्यू झाला. कंटेनरचालक समाधान बाळू कोकरे (रा. मेटकरवाडी घेरडी, ता. सांगोला) याच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नरसिंह अप्पा चव्हाण (रा. खर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक राजुलवार तपास करत आहेत.
अक्षय मलमे
किरण गुजले
अजय मंडले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.