आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकी शिक्षण:राज्यामध्ये 349 महाविद्यालये, प्रवेश क्षमता 1 लाख 35 हजार ; बारावी निकालानंतर सीईटीसाठी लगबग

सोलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील अभियांत्रिकी पदवी शिक्षणासाठी एकूण ३४९ महाविद्यालये आहेत. यात दरवर्षी १ लाख ३५ हजार जागा उपलब्ध असतात. दरवर्षी ८० ते ९० हजारांच्या संख्येने प्रवेश होतात. मागील दोन वर्षांपासून, राज्यातील या प्रवेशीत विद्यार्थ्यांपैकी ४२ ते ४५ हजार विद्यार्थ्यांना रोजगार मिळत असल्याची माहिती एआयसीटीई अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नोंदीत नमूद आहे. बारावी निकालानंतर उर्वरित पान ४

सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांना करिअरची उत्तम संधी मिळते आहे, हे स्पष्ट होते. कोरोना काळात वर्क फ्रॉम होम असल्याने प्रत्यक्ष उत्पादन कमी झाल्याने काही प्रमाणात रोजगार घट दिसून आली. आता अनलॉक झाल्याने पूर्वीहून दुप्पट संधी उपलब्ध आहेत, असे मत अभियांत्रिकी शाखेचे अधिष्ठाता डॉ. शंकर नवले यांनी व्यक्त केले आहे.

गत दोन वर्षांपेक्षा यंदा वाढ, वर्क फ्रॉम होममुळे रोजगार मिळतेय संधी ^रोजगाराची संधीमध्ये गत दोन वर्षापेक्षा यावर्षी चांगलीच वाढ झाली आहे. मागील दोन वर्षांत वर्क फ्रॉम होम संकल्पनेमुळे सेवा क्षेत्रातील संधी वाढली होती, त्या तुलनेत प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया, उत्पादन क्षेत्रात रोजगार संधी कमीचा परिणाम दिसून आला. उत्पादन, उद्योजगता वाढ होत असल्याने उत्तम संधी यापुढील काळात दिसून येईल, हे निश्चित. डॉ. शंकर नवले, अधिष्ठाता , अभियांत्रिकी शाखा, सोलापूर विद्यापीठ

बातम्या आणखी आहेत...