आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या पाषाणांना आकार:दक्षिणेतील 35 कारागीर घडवताहेत श्री सिद्धेश्वर सभामंडपासाठीचे पाषाण

रामदास काटकर, रामेश्वर विभुते | सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या सभामंडपासाठी काळ्या पाषाणांना आकार देण्याचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात दक्षिण भारतातील ३५ कारागीर सभामंडपाच्या शिळा घडवण्याचे काम करत आहेत.

दैनिक ‘दिव्य मराठी’ने सात वर्षांपूर्वी सुवर्ण सिद्धेश्वर ही संकल्पना मांडली. श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीने या संकल्पनेचा स्वीकार करत त्यानुसार कामाला सुरुवात केली. या संकल्पनेचाच एक भाग म्हणून मुख्य गर्भगृहासमोरील सभामंडपाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. पूर्वी असणाऱ्या लोखंडी सभामंडपाच्या जागी काळ्या पाषाणाचा सभामंडप उभारण्यात येत आहे. या पाषाणांना आधुनिक उपकरणांचा वापर करत पारंपरिक शैलीत घडवण्यात येत आहे. प्राचीन शैली आणि आधुनिक पद्धतीचा संगम कुमठे गावाजवळील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या खुल्या प्रांगणात पाहायला मिळत आहे.

सभामंडपात बसवण्यात येणाऱ्या पाषाणांचे घडीव काम व मोठ्या पाषाणांचे कटिंग काम व त्यावर पानेफुले, विविध प्रकारची कलाकुसर करण्याचे काम करण्यात येत आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी ही माहिती दिली.

काळ्या बेसाॅल्टचा वापर मंदिराच्या सभामंडपाचे काम टिकाऊ आणि सुबक व्हावे यासाठी काळ्या बेसॉल्ट खडकाचा वापर करण्यात येत आहे. या मोठ्या पाषाणांचे कटिंग करून त्याचे एका आकारात कच्चे खांब बनवणे, त्याचे मोजमाप करून साचेबद्ध आकारात त्यावर कोंदणकाम म्हणजे विशेष शैलीत कोरीव काम करण्यासाठी वेगळा चमू काम करत आहे. कर्नाटकाच्या बंगळुरूतील हे कारागीर असून आर्किटेक्ट तथा काॅन्ट्रॅक्टर विष्णू कुमार यांच्याकडे याचा ठेका आहे.

असे होत आहे काम सभामंडप : १०० फूट बाय १८० फूट विविध आकाराचे दगडी खांब : ३०० एका पाषाणाचे वजन : ९०० किलो एका दगडी खांबाचे वजन : १८० कि. एका खांबाची उंची : साडेपाच फूट एका मोठ्या पाषाणाचे कटिंग साधारणपणे १५ ते २० मिनिटात होते. कटिंग केलेल्या दगडांवर कारागीर कोरीव व नक्षीकाम करतात.

बातम्या आणखी आहेत...