आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगाराला सुमारे सहा लाखांचे उत्पन्न:तुळजापूरला धावल्या 350  एसटी गाड्या

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्रनिमित्त अंबाबाईच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतात. तुळजापूरला जाण्यासाठी एसटी महामंडळाने ३५० गाड्यांची सोय केली होती. या नऊ दिवसांत महामंडळाच्या सोलापूर आगाराला सुमारे सहा लाखांचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती प्रशासनाने दिली.

दरवर्षी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला जाणाऱ्या प्रवाशांचे नियोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षीही एसटी प्रशासनाने याबाबत सजग राहून प्रवाशांसाठी अधिक गाड्यांचे नियोजन केले होते. यात जवळपास ३० गाड्यांवर अधिक गाड्यांची व्यवस्था करण्यात आली.

दसऱ्याला २२ फेऱ्या : नऊ दिवसांत ३५० गाड्या तुळजापूर-सोलापूर वाहतूक करीत आहेत. दसऱ्याला २२ फेऱ्या एका दिवसामध्ये झाल्या. ६ लाखांपर्यंत उत्पन्न पोहोचले. कोरोनानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर नवरात्र झाल्याचे पाहायला मिळत आहेत, असे विभागीय वाहतूक अधिकारी सुरेश लोणकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...