आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुळांचे मोठे नुकसान:मलखेड-मुंबई मालगाडीचे 4 डबे दोन इंजिनसह शेतात घुसले, जीवितहानी नाही

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रेक फेल झाल्याने सिग्नल तोडून पुढे गेलेली मालगाडी डेड एन्ड फोडून बाजूच्या शेतात घुसली. दोन इंजिन काळ्या मातीच्या रानात गेले. चार डबे रुळावरून उतरले. केम रेल्वे स्थानकावर रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. मालगाडीला हा अपघात झाल्याने जीवित हानी झाली नाही. पण रेल्वे मार्गाचे बरेच नुकसान झाले आहे. अपघात सायडिंगच्या रेल्वे मार्गावर झाल्याने प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला नाही.

सिमेंट पोती भरलेली मालगाडी मलखेडहून मुंबईला निघाली होती. सुमारे अठराशे टन सिमेंट ४५ वॅगनमध्ये भरलेले होते. केम स्थानकावर गाडी आल्यानंतर मागून येणाऱ्या प्रवासी गाडीला मार्ग मोकळा करून देण्यासाठी मालगाडीसाठी लाल सिग्नल दिला होता. त्यामुळे चालकाने गाडी थांबवण्यासाठी ब्रेक दाबला. पण ब्रेक लागला नाही. तीन चार किलोमीटर दूर असताना गाडी थांबवण्याकरिता चालकाने चार वेळा ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. पण फेल ब्रेकमुळे गाडी थांबली नाही.

गार्ड नव्हता मालगाडीला : अलीकडे मालगाड्यांवर गार्डची नेमणूक न करण्याचा निर्णय केंद्रीय प्रशासनाने घेतला आहे. कधी कधी पॉइंटमन दर्जाच्या कर्मचाऱ्याला नेमले जाते. या अपघातग्रस्त गाडीवर तो ही नव्हता. गार्डकडे गाडीवर नियंत्रणाचा पर्याय असतो पण तोही वापरता आला नाही. शिवाय मालगाडीचे डबेही जुनाट असल्याचे सूत्रांनी सांगितले. ब्रेक का व केंव्हा फेल झाले? मलखेडपासून निघाल्यानंतर गाडी केमला येण्याच्या अगोदर ते का लक्षात आले नाही? प्रवासी गाड्यांच्या ये-जा होणाऱ्या मार्गावर मालगाडी असती तर गंभीर स्थिती निर्णाण होण्याची शक्यता होती. पण सुदैवाने ती टळली. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश उच्च स्तरावरून देण्यात आले आहेत.

ताशी ५० चा वेग, नसावा दुसरा पर्याय
ताशी सुमारे पन्नास किलोमीटर वेगाने धावणारी गाडी सायडिंगच्या मार्गावर घेण्यात आली. ब्रेकच लागत नसल्याने गाडी थांबवण्यासाठी चालकाजवळ दुसरा पर्याय नसावा. दोन इंजिन व सिमेंटचे प्रचंड लोड असलेल्या मालगाडीने डेड एन्ड फोडले. दोन्ही इंजिन रूळ सोडून शेतात घुसले. चार डबे रुळावरून उतरले. अवजड गाडीमुळे रेल्वे मार्गाचे मोठे नुकसान झाले.

बातम्या आणखी आहेत...