आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील समस्यांवर मंथन:‘स्मार्ट इंडिया’ स्पर्धेत वालचंद अभियांत्रिकीला 4 लाखांचे बक्षीस

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन -२०२२’ या ग्रॅण्ड फायनल स्पर्धेमध्ये वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या चार संघांनी प्रत्येकी एक लाख रुपये, अशी एकूण चार लाख रुपयांची पारितोषिके पटकावून पुन्हा एकदा अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता सिद्ध केली आहे. मार्च २०२२ मध्ये झालेल्या उपांत्य फेरीत विविध नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातील ६३ संघांपैकी डब्ल्यूआयटीच्या चार संघांची निवड ग्रॅण्ड फायनलसाठी झाली. ‘द हेक्सास्प्रा’ संघ कर्नाटक, बंगळुरूमध्ये जाऊन ‘ई – वेस्ट मॅनेजमेंट’ या थीमवर सुधारित अशा एस.ए.डब्ल्यू.ए.एस. या प्रणालीचे सादरीकरण केले. टीम लीडर संयम रवणे यासह राजस दर्यापूरकर, सुनयना वेळापुरे, जीत शेंडेकर, अमन जैन, प्रतीक्षा तमशेट्टी यांचा सहभाग होता.

आपत्ती व्यवस्थापन थीम घेऊन (गांधी नगर, गुजरात) येथे टेक आर्मी संघाने प्रकल्प सादर केला. “धरणांमधून पुराचे पाणी सोडल्यानंतर नदीकाठच्या गाता पूरस्थिती निर्माण होते. तेव्हा पाण्याच्या विसर्गाचे गणित करून भौगोलिक परिस्थितीनुसार पाणी किती दूरपर्यंत पोहोचेल याचे गणित करणे आणि त्यानुसार संभाव्य पुराची मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे पूर्वसूचना देणे असे या प्रयोगाचे स्वरूप होते. टीम लीडर स्वाती कुलकर्णीसह मधुरा सरसंबी, श्रावणी नोरा,अक्षिता जोशी, दुर्गेश कुडलकर, वरुण लोहड़े यांचा सहभाग होता. दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरबाबत मार्गदर्शन करणारा “वन अँड झीरो ब्रेन्स’ संघाने ने एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड वेब बेस्ड प्लॅटफॉर्म तयार केलं. मल्टिपल इंटेलिजन्स थियरीचा वापर करून एक चाचणी तयार केली. यात बुद्धिमत्ता, करिअर मार्ग ओळखता येतो आणि त्या करिअर संबंधी माहितीसुद्धा मिळवता येते. तेलंगणाच्या वारंगळला गेलेल्यामध्ये टीम लीडर प्रणाली बावधानकर, लावण्या आकेन, तुलसी कोकरे, प्रणोती कोडम, हेमंत देशमुख आणि निधिश पाटील यांचा सहभाग होता. पेन रिलीव्हर संघाने ‘नी बडी’ हे उपकरण बनविले. ज्येष्ठ नागरिकांना गुडघ्यातील वंगण कमी पडल्याने गुडघादुखीच्या वेदना असह्य होतात. अशा लोकांना या यशस्वी प्रयोगामुळे दिलासा मिळणार आहे. चेन्नईला गेलेल्या टीममध्ये अक्षय कुलकर्णीसह केदार आदटराव, राहुल जैन, तन्वी शिंदे, वैष्णवी चव्हाण आणि म. तसद्दुक होते.

देशातील समस्यांवर मंथन केंद्रीय शिक्षण विभागाच्या वतीने भारत सरकारच्या सर्व मंत्रालयांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर उपाय शोधणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा दोन स्वरूपातून ही स्पर्धा होते. देशभरातील महाविद्यालयाने यात सहभाग घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...