आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:कुंभारीजवळ प्रवासी जीपचा टायर फुटल्याने अपघात 4 ते 5 जण ठार, पोलिस घटनास्थळी दाखल

​​​​​​​सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकोट येथून सोलापूरकडे येत असलेल्या प्रवासी जीपचा कुंभारी जवळ मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजता टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघात चार ते पाच जण ठार झाले असून चार जण जखमी झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

अक्कलकोटहून सोलापूरकडे येणाऱ्या एमएच १३ एएक्स १२३७ या जीपचे पुढील टायर फुटल्याने सोलापूर - अक्कलकोट रोडवर कुंभारी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर गाडी उलटली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात चार जण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये महिलाचा ही समावेश आहे.

अपघातात जखमी झालेल्या लोकांना नागरिकांनी जवळच्या दवाखान्यात हलवले असून, वळसंग पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.गाडी रस्त्याच्या खड्ड्यात जावुन पडली.

बातम्या आणखी आहेत...