आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेत्या आठवड्यात सुरू होणाऱ्या शाळेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातून वाड्या वस्त्यातून तालुक्याला जाणाऱ्या तब्बल 40 गाड्या या शाळकरी मुलांसाठी सज्ज असणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. याकरिता गाड्याची तपासणी गाड्या व्यवस्थित ठेवून त्यांचे कोणत्या रस्त्यावर नियोजन करायचे आहे, हे नियोजन तयार करण्यात आले आहे.
त्यानुसार जवळपास 40 हून अधिक गावाला या गाड्या पाठवण्याचे नियोजन करण्यात आले. याकरिता मुलांच्या पासची व्यवस्था करण्यात आली आहे. साधारणपणे मोहोळ पंढरपूर मंगळवेढा बार्शी करमाळा अक्कलकोट अशा विविध गावातील जवळपास 40 हुन अधिक गावातून सकाळी शाळेच्या वेळेत या गाड्या सोडल्या जाणार आहेत. या गाड्याचे संध्याकाळचे नियोजन मुलांना त्यांच्या गावी सोडण्याच्या दृष्टीकोन करण्यात आले आहे. त्यामुळे शाळकरी मुल-मुली यांची उत्तम सोय होणार असल्याची काळजी एसटी प्रशासनाने घेतली आहे.
मुलींसाठी आवाहन
मुलींच्या सुरक्षेसाठी एसटी प्रशासनाने विशेष संवेदनशीलता दाखवली. एसटी प्रशासनाच्यावतीने जर काही अनुचित प्रकार घडला किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर थेट वाहक आणि चालक अशी संपर्क साधून आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दलची माहिती द्यावी आणि त्यावर कारवाई कारवाई स्वरूपात काय करता येईल, याचे नियोजन देखील प्रशासनाच्यावतीने करण्यात येणार आहेत. त्यामुळे शाळेतून घरी जाताना आणि घरुन शाळेकडे जाणाऱ्या मुलींना जर काही समस्या भेडसावू आली तर त्यांनी थेट एसटी प्रशासनाला आणि वाहक चालकाला संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
40 हून अधिक गाड्या धावतील
दोन-तीन दिवसात सुरू होणाऱ्या शाळेचा पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील छोट्या वाड्या वस्त्या आणि गावातून तालुक्याच्या स्तरावर माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचता यावे आणि पावसाळ्याच्या काळामध्ये त्यांना त्रास होऊ नये, या भावनेतून आम्ही साधारणपणे 40 हून अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या ग्रामीण भागाकडे वळवण्याचे नियोजन केले आहे. उन्हाळ्यात शाळांना सुट्टी असल्यामुळे आणि कोरोनाच्या दोन वर्षांच्या गॅपमुळे एसटी महामंडळाच्या एसटीमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गोठली होती. त्यामुळे या इतक्या लांब पल्ल्याच्या अंतरावर वापरल्या जात होत्या. आता त्याच गर्दीचा मौसम संपल्यानंतर शाळेकरिता वर्षभर सेवा देणार आहेत, असे विभागीय वाहतूक अधिकारी सुरेश लोणकर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.