आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:दिवाळीला माहेरी जात असताना बाइकवरून पडली 40 वर्षीय महिला, जागीच मृत्यू; माढा-वैराग मार्गावरील दुर्घटना

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या अपघातात त्यांचा 4 वर्षांचा मुलगा आणि बाइक चालवणारा भाचा सुखरूप आहेत

माढा तालुक्यातील माढा-वैराग मार्गावर एका दुचाकी अपघातात एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. केवड आश्रमशाळेजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रेश्मा दत्तात्रय सुतार आपल्या भाच्याच्या बाइकवर मागे बसून माहेरी जात होत्या. मात्र, अचानक त्या गाडीवरून पडल्या आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

वडाचीवाडी (उबु, माढा) येथून धनंजय सुतार हा मामीला व त्यांच्या एका लहान मुलाला (4) गौडगाव बार्शीला दिवाळी निमित्त सोडण्यास मोटरसायकल वरुन जात होता. या दरम्यान, असताना माढा वैराग मार्गावरील केवड आश्रमशाळेसमोरील गतिरोधक वरुन पुढे जाताना रेश्मा यांचा तोल जाऊन त्या रस्त्यावर खाली कोसळल्या. खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. माढा ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रमोद बोबडे यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असे घोषित केले.

दिवाळीनिमित्त आपल्या गावी जाण्याची सर्वांनाच घाई आहे. गावी जाणे आणि आपल्या गावी परतणे असे प्रवास सुरूच आहेत. मात्र, सणासुदीसह इतर वेळी सुद्धा वाहने सावकाश आणि संयमाने चालवणे हाच एक उपाय आहे. दरम्यान, याच बाइकवर असलेला त्यांचा लहान मुलगा आणि भाचा सुखरूप आहेत.