आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाजीरवाणे:स्वच्छता परीक्षेत ४१४६ शाळा नापास; केंद्र सरकारच्या स्वच्छ शाळा पुरस्कारासाठी ०.९ टक्केच पात्र

साेलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाकडून दिल्या जाणाऱ्या स्वच्छ शाळा पुरस्कारासाठी जिल्ह्यातील ४ हजार १८४ फक्त ३८ शाळाच पात्र ठरल्या. उरलेल्या सर्व शाळा एका अर्थाने नापास झाल्या. पुरस्कार निवडीसाठी सहा निकष आणि काही उपनिकष होते. त्यात ३८ शाळांची जिल्हास्तीय पुरस्कारासाठी निवड झाली.

स्वच्छता अतिशय मूलभूत गोष्ट असताना, मूल्यशिक्षणाचा भाग असताना स्वच्छ शाळा म्हणून इतक्या कमी संख्येने शाळांची निवड व्हावी, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षणाधिकारी वेळोवेळी शाळांना भेटी देत नाहीत. स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सोय आदी गोष्टींची पाहाणी करत नाहीत, असाच त्याचा अर्थ आहे.

पुरस्कारासाठी सहभागी शाळा व निवड शाळांची संख्या पाहिली असता ०.९ टक्के निकाल लागलेला दिसतो. असे असेल तर इतर शाळा अस्वच्छ म्हणायच्या का, असा सवाल उपस्थित होतो. जिल्ह्यातील सहा निकष पूर्ण करणाऱ्या ८ शाळा व उपनिकष पूर्ण करणाऱ्या ३० शाळांचा समावेश आहे.

शासकीय, अनुदानित व खासगी शाळा पात्र असून त्यांना या पुरस्कारासाठी नामांकन सादर केली जातात. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूरच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. एकूण जिल्ह्यातील ४००० हून अधिक शाळांचा सहभाग होता. त्यामध्ये माध्यमिकच्या १०८७ व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक २७९७ व शहरात महापालिकेसह इतर ३०० शाळांचा समावेश आहे. सर्वच शाळा सहभागी झालेल्या होत्या.

निवडीचे स्वच्छतागृह, पाण्यासह सहा निकष
शाळांमध्ये पाण्याची उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, हात धुण्यासाठी व्यवस्था, देखभाल व्यवस्था, वर्तन बदल व क्षमता विकास या मुद्द्याच्या आधारे समितीने पाहणी करून गुणांकन दिले. स्वच्छ शाळा स्पर्धेकरिता निश्चित करण्यात आलेल्या सहा उपघटकांसाठी निर्देशांक निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार शाळांना प्राप्त होणारे गुण विचारात घेऊन श्रेणी देण्यात येते. त्यानुसार शाळेची निवड होते.

मग अस्वच्छ शाळांना जबाबदार कोण?
धड स्वच्छतागृह नसलेल्या शाळाची संख्या मोठी आहे. कसेबसे स्वच्छतागृह असेल तर पाण्याची सोय नाही, अशी स्थिती बहुतांश शाळांची आहे. महापालिकेच्या शाळांची गत अशी की विचारायची सोय नाही. यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींची कुचंबना होते. वर्गांत झाडलोट होत नाही. डेस्कवर धूळ साचलेली असते. याला जबाबदार कोण? संस्था, मुख्याध्यापक की शिक्षण विभागाचे अधिकारी?

बातम्या आणखी आहेत...