आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआदिमाया अंबाबाईचा जागर करण्यासाठी शहरातील ४२२ सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळांनी पोलिस यंत्रणेकडून परवाना घेतला. पैकी ६० मंडळे सोमवारी घटस्थापनेदिवशी विविध भागांतून सवाद्य मिरवणुका काढतील. नवरात्र कालावधीत संपूर्ण शहरात दाेन हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सार्वजनिक मंडळे रात्री दहापर्यंत ध्वनिपेक्षके लावू शकतील. ४ ऑक्टोबरला मात्र रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी असल्याची माहिती पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी दिली.
सातही ठाण्यांच्या हद्दीत पोलिस यंत्रणा सतर्क केली. ४२२ पैकी ६० मंडळांकडून देवी प्रतिष्ठापना मिरवणूक निघेल. त्यानंतर आणखी काही मंडळे ५ ऑक्टोबरला निघणाऱ्या सीमोल्लंघन मिरवणुकीस सहभागी होतील. असा सर्व मिरवणुकांमध्ये कुठलीही विघ्ने येऊ नयेत, यासाठी पोलिस अधिकारी मध्यवर्ती मंडळांच्या संपर्कात आहेत.
असा असेल बंदोबस्त
तीन उपायुक्त, पाच सहाय्यक आयुक्त, २४ निरीक्षक, ५० फौजदार, ११६१ पोलिस कर्मचारी, ८०० होमगार्ड, एक राज्य राखीव दलाची तुकडी असा साधारण दोन हजारांहून अधिक बंदोबस्त राहणार आहे. याशिवाय पेट्रोलींग पथक, शीघ्र कृती दल, राखीव पोलिस दल, बॉम्बशोधक नाशक पथक अशी यंत्रणा सज्ज आहे.
रूपाभवानी परिसरात १९ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, २०० पोलिस तैनात साेमवारपासून नवरात्राेत्सवाला प्रारंभ हाेत आहे. तुळजाभवानीचे प्रतिरूप असलेल्या रूपाभवानीच्या दर्शनासाठी दरराेज सुमारे १० हजार भाविक येतील. त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण मंदिर परिसरात १९ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. शिवाय २०० पाेलिस असतील. कुठल्याही अनुचित प्रकारावर तातडीने कारवाई करण्याची यंत्रणाही तैनात करण्यात आली.
काेराेना संसर्गामुळे गेली दाेन वर्षे सार्वजनिक उत्सवांवर निर्बंध हाेते. धार्मिक विधी मर्यादित स्वरूपात झाल्या. नवरात्राेत्सवात गरबा, दांडिया नव्हता. त्यामुळे भक्तांचा हिरमाेड झाला हाेता. यंदा उत्साहाने नवरात्राला प्रारंभ हाेत आहे. रूपाभवानी दर्शनासाठी प्रामुख्याने महिला भक्त माेठ्या संख्येने येण्याची शक्यता गृहित धरून संपूर्ण मंदिर परिसरात नियाेजन करण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.