आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हलगर्जीपणा:सोलापुरातही लपवले कोरोनाचे 43 मृत्यू, दोन महिन्यांनंतर बळींची नोंद, मनपा आयुक्तांकडून सारवासारव

सोलापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फॉलोअप घेण्यात कमी पडलो - पी. शिवशंकर, आयुक्त

साेलापूर शहरात गेल्या दाेन महिन्यांत काेराेनाने मृत्यू झालेल्या ४३ जणांच्या नाे‌ंदी लपवल्या. त्या नाेंदी साेमवारी रात्री अचानक पत्रकार परिषद घेऊन मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी जाहीर केल्या. रुग्णालयांसह मनपाच्या कारभारातील हलगर्जीपणामुळे दाेन महिने ही आकडेवारी लपवली गेली ही गंभीर चूक असून, सिव्हिल रुग्णालय, मार्कंडेय, अश्विनीसह शहरातील ८ रुग्णालयांना या गफलतीमुळे नोटिसा देण्यात आल्याची माहिती महापालिका पी. शिवशंकर यांनी दिली. गेल्या दाेन महिन्यांतील नाेंदीत न आलेल्या व सोमवारी उघड झालेल्या ४३ जणांच्या मृत्यूच्या आकडेवारीनंतर साेलापुरात आता २१६ इतके बळी झाले आहेत.

फॉलोअप घेण्यात कमी पडलो

शासकीय आदेशानुसार एसएलपी अॅपमध्ये मृत्यूची आकडेवारी हॉस्पिटलकडून भरणे आवश्यक आहे. तसेच ही आकडेवारी मनपाकडेही प्रत्यक्ष द्यायची आहे. मात्र प्रशासकीय चुकीमुळे आकडेवारी योग्य प्रकारे अपडेट झाली नाही. फॉलोअपमध्ये कमी पडलो. - पी. शिवशंकर, आयुक्त

फडणवीसांचा दाैरा आणि आकडेवारी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १३२८ कोरोना बळींच्या लपवाछपवीबद्दल राज्य सरकारला धारेवर धरले होते. आता बुधवारी ते साेलापुरात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दाेन दिवस अगाेदर प्रशासनाने आकडेवारी जाहीर केली. त्यामुळे लपवाछपवी उघड करण्यामागे फडणवीस दाैऱ्याचा संदर्भ असल्याचा संशय बळावला आहे.

हॉस्पिटलना नोटिसा : मार्कंडेय रुग्णालय, अश्विनी रुग्णालय, अश्विनी कुंभारी, सीएनएस, सिद्धार्थ रुग्णालय, यशाेधरा व युनिक या हॉस्पिटलला नोटिसा दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...