आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गास गती:452 कोटीस मंत्रिमंडळाची मान्यता ; 9 गावांमध्ये जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग सुकर झाला आहे. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५० टक्के सहभाग म्हणजेच ४५२ कोटी ४६ लाख रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वीच सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेच्या भूसंपादन प्रक्रियेस विशेष दर्जा दिल्याने ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील ९ गावांतून १८५.४२ हेक्टर जमीनीचे संपादन केले जाणार आहे.

सोलापूर ते उस्मानाबाद या ८४ किलोमीटर रेल्वेमार्गासाठी एकूण ९०४ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी ५० टक्के म्हणजे ४५२ कोटी ४६ लाख रूपये आर्थिक सहभाग देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. या मार्गावर एकूण १० रेल्वे स्थानक असून पुढील ४ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सोलापूरहून तुळजापूर, उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केंद्र व राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. रेल्वे मंत्रालयाने घोषणा करूनही याबाबत कोणतीहीच हालचाल झाली नव्हती. सहा महिन्यांपूर्वी संपादनाच्या कामास सुरूवात झाली तर मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत ५० टक्के आर्थिक सहभागास राज्य शासनाने मंजुरी दिल्याने रेल्वे मार्ग लवकरच पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.

६ महिन्यांत भूसंपादन प्रक्रिया होणार पूर्ण {सोलापूर जिल्ह्यातील ९ गावांतून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. यासाठी २१० गट बाधित होत असून १८५.४२ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे.

{खेड, मार्डी, बाळे, बाणेगाव, भोगाव, देगाव, होनसळ, कसबे सोलापूर व सेवालाल नगर यापैकी मार्डी गावाची मोजणी पूर्ण झालेली आहे. {शासनाने संपादनास विशेष दर्जा दिल्याने सहा महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करणार असे भूसंपादन अधिकारी नागेश पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...