आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोल्स कारवाई:केगावजवळ 47 किलो चंदन जप्त; दोघांना अटक

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केगावजवळ ४७ किलो चंदनाचे ओंडके (लाकडे ) घेऊन जाताना ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई ३ एप्रिल रोजी सायंकाळी केगाव - पाकणी या मार्गावर केली. पिंटू भीमा गायकवाड (वय २७), आकाश भैरू भोसले (वय १९, रा. दोघे हराळवाडी, मोहोळ) यांना अटक झाली आहे. सोलापूर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेजण चंदनाची झाडे तोडून दुचाकीवरून नेणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून दोघा युवकांना मुद्देमालासहित अटक करण्यात आली.

चंदनाची लाकडे, झाडे तोडण्याचे साहित्य, पैसे आणि दुचाकी, मोबाइल असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ग्रामीण गुन्हे शाखेचे फौजदार शैलेश खेडकर यांच्यासह नीलकंठ जाधवर, प्रकाश कारटकर, हरिदास पांढरे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...