आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी कर रचना:पुढील वर्षापासून मिळकत करात 5 टक्के वाढ; नोटीस वाटप सुरू

सोलापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने मिळकत करात वाढ केली आहे. सन २०२३-२४ च्या मिळकत कर बिलात सरासरी ५ टक्क्यांची वाढ निश्चित केली आहे. त्यापेक्षा जास्त कर आकारणीही होऊ शकते. सन २००५ नंतर बांधकाम केलेल्या सुमारे ४० हजार मिळकतदारांना पहिल्या टप्प्यात वाढीव कराची नोटीस देण्यात येणार असून सध्या यापैकी १४ हजार जणांना नोटिसांचे वाटप सुरू आहे.

नोटीस मिळाल्यावर २१ दिवसांच्या आत हरकत घेतली नाही तर ते मान्य असे गृहीत धरून महापालिकेकडून वाढीव कर सन २०२३-२४ च्या बिलात समाविष्ट करून वसूल करण्यात येणार आहे. महापालिकेने यापूर्वी वाढीव कराची बिले दिली होती. पण त्यास विरोध झाल्याने महापालिका आयुक्तांनी त्या नोटिसा मागे घेतल्या होत्या. आता नव्याने वाढीव कराच्या नोटीस पाठवण्यात येत आहेत. यापूर्वी बांधकामाच्या भिंती क्षेत्रासाठी कर आकारणीत १५ टक्के सूट होती, ती सूट बंद करण्यात आली आहेे. त्यामुळे करात सरासरी ५ टक्के वाढ होणार आहे. याशिवाय वाढीव बांधकाम, रूप बदल केले असेल तर नव्याने कर आकारणी करण्यात येणार आहे.

१४ हजार नोटीस वाटप सुरू
पहिल्या टप्प्यात सन २००५ नंतरच्या बांधकामांची ४० हजार बिले तयार करण्यात येत असून, त्यापैकी १४ हजार बिलांची छपाई करण्यात आली. त्या बिलांचे वाटप करण्यात येत आहे. एकूण सव्वा ते दीड लाख नोटीस काढण्यात येणार आहे.

२१ दिवसांत हरकती दाखल करणे आवश्यक
वाढीव बिलाची नोटीस मिळाल्यानंतर ती मान्य नसेल तर २१ दिवसांच्या आत संबंधीत कागदपत्रांसह हरकत घेणे आवश्यक आहे. अन्यथा ती नोटीस मान्य असे गृहीत धरून टॅक्स आकारणी करण्यात येणार आहे.

इतर करांत वाढ नाही
शहरातील ६२ पेठनुसार कराची रचना आहे, त्यानुसार वाढ होईल. यापूर्वी ५ हजार रुपये कर आकारणी होत असेल तर आता नव्या रचनेत २४० रुपये वाढ होईल. शिक्षण करसह इतर शासनाचे करात वाढ होणार नाही.

सरासरी पाच टक्के कर वाढ होणार आहे. यासाठी नोटीस काढले असून, त्यांचे वाटप करण्यात येत आहे. नोटीस वाटपानंतर आलेल्या हरकतीवर सुनावणी होईल. त्यानंतर आकारणी करून बिले वाटप करण्यात येणार आहे.''- श्रीराम पवार, सहा. आयुक्त, कर आकारणी

बातम्या आणखी आहेत...