आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • 5 Percent Tax Increase From Next Year 14 Thousand Notices Will Be Distributed In The First Phase, Priority Will Be Given To Post 2005 Buildings

पुढील वर्षापासून 5 टक्के कर वाढ:पहिल्या टप्यात 14 हजार नोटीस वाटप सुरु, 2005 नंतरच्या इमारतींना प्राधान्य

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मिळकतदारांना महापालिका कर वाढवून देणार असून, सन 2023-24 च्या मिळकतकर बिलात सरासरी 5 टक्के करवाढ निश्चीत करण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्तही कर येऊ शकतो. सन 2005 नंतर बांधकाम केलेल्या सुमारे 40 हजार मिळकतदारांना पहिल्या टप्यात वाढीव कराचे नोटीस देण्यात येत आहे. यापैकी 14 हजार जणांना नोटीस वाटप करण्यात येत आहे. त्यावर 21 दिवसांच्या आत हरकत घेतली नाहीतर ते मान्य असे गृहीत धरुन महापालिका वाढीव कर सन 2023-24 च्या बिलात समावेश करुन वसुल करण्यात येणार आहे.

महापालिकेने यापूर्वी वाढीव कराचे बिल दिले होते त्यास विरोध झाल्याने ते नोटीस महापालिका आयुक्तांनी मागे घेतले आता नव्याने वाढीव कराचे नोटीस पाठवण्यात येत आहेत.

बांधकामाच्या भिंती क्षेत्रासाठी 15 टक्के कर आकारणी यापूर्वी सुट होती ती सूट बंद करण्यात आली आहेे. त्यामुळे सरासरी 5 टक्के करात वाढ होणार आहे. याशिवाय वाढीव बांधकाम, रुप बदल केले असेल तर नव्याने कर आकारणी करण्यात येणार आहे.

सरासरी करात 5 टक्के वाढ

मिळकत करात पाच टक्के वाढ होणार आहे. त्यानुसार आकारणी करुन बिले वाटप करण्यात येणार आहे. शहरातील 62 पेठनुसार कराची रचना असून, त्यानुसार वाढ होईल. यापूर्वी 5 हजार रुपये कर आकारणी होत असेल तर आता नव्या रचनेत 240 रुपये वाढ होईल. शिक्षण करसह इतर शासनाचे करात वाढ होणार नाही.

14 हजार नोटीस वाटप सुरु

पहिल्या टप्यात सन 2005 नंतरचे बांधकामाचे 40 हजार बिले तयार करण्यात येत असून, त्यापैकी 14 हजार बिलाची छपाई करण्यात आले. त्याचे वाटप करण्यात येत आहे. एकूण 1.25 ते 1.50 लाख नोटीस काढण्यात येणार आहे.

21 दिवसात हरकती आवश्यक

वाढीव बिलाचे नोटीस मिळाल्यानंतर ते मान्य नसेल तर 21 दिवसांच्या आत सबंधीत कागदपत्रासह हरकत घेणे आवश्यक आहे. अन्यथा ते मान्य असे गृहीत धरुन टॅक्स आकारणी करण्यात येणार आहे.

नोटीस वाटप सुरु

पाच टक्के सरासरी कर वाढ होणार आहे. यासाठी नोटीस काढण्यात आले असून, त्याचे वाटप करण्यात येत आहे. नोटीस वाटपानंतर आलेल्या हरकतीवर सुनावणी होईल. त्यानंतर आकारणी करुन बिले वाटप करण्यात येणार आहे. - श्रीराम पवार, सहाय्यक आयुक्त, पालिका कर आकारणी

बातम्या आणखी आहेत...