आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेडिरेकनर:घरे, दुकानांच्या मुद्रांक शुल्कात 5 ते 15 टक्क्यांची वाढ; खुल्या जागेच्या मुद्रांक शुल्कात 25 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारने जमिनीच्या शासकीय दरात (रेडिरेकनर) वाढ केली आहे. सोलापूर शहरातील खुल्या जागांच्या दरात २५ ते ४० टक्के वाढ केली आहे. तयार घरे, दुकाने व कार्यालयासाठी भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्कात सरासरी ५ ते १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. नवी पेठ, कसबा पेठ, लक्ष्मी पेठ, अवंतीनगर व पाच्छा पेठ या भागातील जागेसाठी अधिक मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. शेळगी, अक्कलकोट रोड यासह इतर ठिकाणी १० ते २५ टक्के वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारने २०२० नंतर आता रेडिरेकनरच्या दरात वाढ केली आहे.

पण त्या तुलनेत यंदा मोठी वाढ आहे. विशेषत: नागरिकांना गुंतवणुकीकडे खुल्या जागेसाठी अधिक कल असतो. राहण्यासाठी गरज म्हणून तयार घरे घेतली जातात, त्यामध्ये ५ ते १५ टक्के वाढ केली आहे. सोलापूर शहरात खुल्या जागेच्या मुद्रांक शुल्कात २५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. विशेषत: हद्दवाढ असलेल्या जुळे सोलापूर, विजापूर रोड, शेळगी, अवंतीनगर या भागात अधिक दर वाढले आहेत. शहरात तयार घरांबरोबरच खुल्या जागेसाठीही मोठी मागणी आहे. रेल्वे लाइन्स, नवी पेठ, पाच्छा पेठ या भागात तयार घरांचे ५ हजारहून अधिक आहे. शेळगी, देगाव, अक्कलकोट रोड या भागात तयार घरांचे दर २५०० ते ३ हजारांपर्यंत आहेत.

शुल्कही जास्त लागणार
राज्य सरकारने जमिनीच्या शासकीय बाजारमूल्यात वाढ केली आहे. आम्ही ५ ते १० टक्के वाढ सुचवली होती. शहरातील काही भागात ५० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. बाजारातील दर अधिक असले तरी नागरिकांना शासनाला मुद्रांक शुल्क अधिक भरावे लागणार आहे. रहिवास क्षेत्र असलेल्या ठिकाणीच अधिक वाढ केली आहे. खुल्या जागेच्या व्यवहारांवर थोडाफार परिणाम होऊ शकतो.’’
सुनील फुरडे, राज्याध्यक्ष, क्रेडाई

बातम्या आणखी आहेत...