आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय शिक्षण धोरणातील २०३० पर्यंत किमान ५० टक्के युवक उच्च शिक्षणाच्या परिघात आणले पाहिजेत, असे दिलेले उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधनाबरोबरच बहुविद्याशाखीय शिक्षणावर भर दिला पाहिजे. सुदैवाने सोलापूर विद्यापीठाला चांगल्या शिक्षण संस्था संलग्नित आहेत, विद्यापीठाने नवीनतम अभ्यासक्रमांची निर्मिती केली आहे, नवी इमारत, परीक्षा भवन बांधकाम, जागतिक दर्जाचे क्रीडांगण, इनडोअर स्टेडिअम , १५० हून जास्त कोर्सेस सुरू केले आहेत. नवी आव्हाने पेलून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रगतीच्या कक्षा अधिक रूंदावता येतील, असे मार्गदर्शन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १८ वा वर्धापन दिन समारंभ सोमवारी साजरा झाला. सकाळी साडेनऊ वाजता कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. उद्योजक किशोर चंडक यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रोख ५१ हजार , स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा घेतला. डॉ. दत्ता घोलप यांनी परिचय करून दिला.
सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली, प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले. आभार डॉ. प्रकाश व्हनकडे यांनी मानले. कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, विद्यापीठाची प्रगती राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचली आहे. म्हणूनच विद्यापीठास मोठ्या प्रमाणात सीएसआर फंड मिळत आहे. त्या माध्यमातून शिष्यवृत्तीसारख्या योजनेबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडांगणे तयार करता आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.