आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायी परंपरा:आई तुळजाभवानीच्या दर्शनाची आस, लेकरांचा 50 हजार पावलांचा प्रवास

सोलापूर / म. युसूफ शेख2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवी तुळजाभवानीच्या दर्शनाच्या ओढीने शेकडो लेकरांची पावले तुळजापूरच्या दिशेने झपाझप पडत आहेत. १२ ते १८ तासांत भाविक सुमारे ५० हजार पावलांचा प्रवास करणार आहेत. कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्गावर पायी निघालेल्या भाविकांची गर्दी झाली आहे.

मुखी ‘आई राजा उदो उदो... सदा नंदीचा उदो उदो’चा गजर करत साधारण एक किमी अंतर कापण्यासाठी पंधरा मिनिटे लागत आहेत. यात हजार पावले पडत आहे. भाविक ५० हजार पावले टाकत तुळजापूरला पोहोचत आहेत.सालाबादप्रमाणे सोलापूरसह आंध्र आणि कर्नाटकातून भाविक निघाले आहेत. तुळजापूरचे ४६ किमी अंतर आहे. एका किलोमीटरमध्ये १०६० ते १०८० पाऊलांचे अंतर होत आहे तर ४६ किलोमीटरमध्ये ४८,७६० ते ४९,६८० पाऊले अंतर हाेत आहे. काही भाविक तेलंगण, आंध्र प्रदेश व कर्नाटकातून येत आहेत. त्यांना १०० किमी चालावे लागत आहे. त्यांची १ लाख पाऊले होतात. त्यांना तुळजापूरला पोहोचण्यासाठी ४८ तास लागत आहेत. त्यामुळे हे भाविक कोजागिरी पौर्णिमेच्या दोन दिवस आधी निघतात. काहीजण बसने अर्ध्या रस्त्यात येतात आणि उरलेला अर्धा रस्ता पायी चालतात.

मंडळ, दानशूरांकडून भाविकांची सेवा : तुळजापूर मार्गावर जागोजागी कॅन्टीन, संस्थांकडून मोफत नाश्ता, चहा, पाणी, जेवण, फळे आदी दिली जात आहेत. इलेक्ट्रिक बोअरचा पाइप लावून स्वच्छतेसाठी पाण्याची साेय केली आहे. काही ठिकाणी वैद्यकीय मदत दिली जात होती. पायाला मलम लावत होते. झाडाखाली थोडासा विसावा घेत आईचा जागर करत पुन्हा पुढे निघत होते.

आमच्यासाठी ११५ किमी
मी, पत्नी व लहान मुलगी असे तिघे आमच्या गावापासून चालत निघालाे आहे. तेथून तुळजापूरपर्यंत साधारण ११५ किलोमीटर अंतर आहे. पायी जात असताना थोडा त्रास होतो मात्र आईचा जागर केला की त्रास नाहीसा होतो.’’
नामदेव पवार, इंडी कर्नाटक

बातम्या आणखी आहेत...