आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवाळीत ५० हजार रुपये ताेळा विकला गेलेल्या साेन्याच्या दरात ५ हजार रुपयांची वाढ झाली. गेल्या महिन्याभरापासून त्याच्या दराचा आलेख वाढताच राहिला आहे. शनिवारचा दर हाेता ५४ हजार ७०० रुपये (३ टक्के जीएसटी वगळून). एेन लग्नसराईत साेन्याचा दर वाढत असल्याने सामान्य ग्राहकांनी खरेदीत मर्यादा आणली.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साेन्याची मागणी वाढत असल्याने दर वाढल्याचे सराफ व्यापारी म्हणतात. भांडवली बाजारातील तेजीचे कारणही दिले. डिसेंबरच्या सुरुवातीपासून साेन्याच्या दराचा आलेख चढता राहिला. विशेष म्हणजे याच महिन्यात सर्वाधिक विवाह मुहूर्त आहेत. त्यामुळे सराफ बाजारात साेने खरेदीला उधाण आले. परंतु दरवाढीने मर्यादाही आली. इतर दागिन्यांपेक्षा साैभाग्याचे अलंकार असलेल्या मंगळसूत्रापुरती सीमित झाली. गुंतवणूक म्हणून साेने घेणाऱ्या दुसऱ्या वर्गाने मर्यादा माेडून खरेदी सुरू केली. त्यामुळे बाजारावर फारसा परिणाम दिसत नाही.
दरवाढ दीर्घकाळ टिकणारी नसते
साेन्यात झपाट्याने हाेणारी दरवाढ दीर्घकाळ टिकत नाही. त्यात पुन्हा काही प्रमाणात घट शक्य असते. त्यानंतर स्थिरावते. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे या दरवाढीकडे तात्कालीक म्हणून पाहता येईल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली.
शिवाय शेअर मार्केटमध्येही तेजी असल्याने दर चढता राहिलेला आहे. एेन लग्नसराईत दरवाढ सुरू झाल्याने सामान्य ग्राहक संभ्रमात आहेत. परंतु गुंतवणूक म्हणून साेने घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने बाजारावर दरवाढीचा परिणाम दिसून येत नाही.-सुरेश बिटला, सराफ व्यापारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.