आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरामेडिकलचे 511 जण विद्यावेतनापासून वंचितच:शासनाकडून महिना 8 हजारांची तरतूद, मात्र 18 महिन्यानंतरही प्रतिक्षा

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बीएस्सी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची विद्यार्थी विद्यावेतनापासून वंचित आहेत. वैद्यकीय शिक्षण संचालकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बीपीएमटीच्या आंतरवासिता विद्यार्थ्यांना 18 फेब्रुवारी 2021 पासून विद्यावेतन लागू करण्यात आहे. मात्र अद्याप पर्यंत मुलांना विद्यावेतन मिळालेले नाही. राज्यातील 511 विद्यार्थी या विद्यावेतनापासून वंचित आहेत.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अंतर्गत राज्यात एकुण 17 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आसून त्यामध्ये बी.एसस्सी (पॅरामेडीकल टेक्नॉलॉजी) अभ्यासक्रम सुरु आहेत. या अभ्यासक्रमाच्या आंतरवासिता विद्यार्थ्यांना विद्यावेतन लागू करण्यात आलेले आहे. या अभ्यासक्रमाची राज्यातील एकुण 1186 प्रवेश क्षमता असून त्यापैकी 754 जणांचे प्रवेश झालेले आहेत. तर आंतरवासिता प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे विद्या वेतनासाठी 511 जण प्रात्र आहेत.

त्यामध्ये सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 19 जणांचा समावेश आहे. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आंतरवासिता कालावधीमध्ये रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी कार्यरत राहतात. रुग्णेसेवेसाठी अपघात विभाग,बाह्य रुग्ण विभागासह इतर विभागातही सेवा देतात. त्याचा फायदा रुग्णांना होत आहे. रुग्णसेवा तातडीने होण्यासाठी प्रत्यक्ष रित्या मदत होते. आंतरवासिता कालावधीमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस बीएचएमएस,भौतिकउपचार, व्यवसायोपचार,बीएएसएलपी,बीपी अॅड ओ यांना आंतरवासिता कालावधीमध्ये विद्यावेतन दिले जात आहे. मात्र बीपीएमटीच्या मुलं मात्र ह्या विद्यावेतनापासून वंचित आहेत.

4 कोटी 90 लाखांची तरतूद

शासनाकडून मागील 18 महिन्यांपूर्वी प्रतिमाह 8 हजार प्रमाणे विद्यावेतन देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार राज्यातील 511 विद्यार्थ्यांसाठी 4 कोटी 90 लाख 56 हजार रक्कमही मंजूर केली आहे. मात्र प्रत्यक्षात ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केलेली नाही.

डॉ. व्ही.एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बीएस्सी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमामध्ये विविध विभागातील विद्यार्थ्यांना आंतरवासिता च्या वेळी विद्यावेतन दिले जात नाही. तसेच विद्यालयाकडून विद्यार्थ्यांना शासनाकडून विद्यावेतन मंजूर झाल आहे. बीपीएमटी सर्व विद्यार्थ्यांना सध्या सुरु असलेल्या कोविड काळामध्ये रुग्णांना रेडीओलॉजी, लॅब ओटी एफएमटी इमर्जन्सी मेडीसीन या विभागात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम केले आहे. विद्यार्थ्यांना शासनाकडून किंवा महाविद्यालया कडून आजपर्यंत एकही पैसा दिलेला नाही.

परंतु इतर विद्यार्थ्यांना विद्यावेतन व मासिक भत्ता दिला आहे. बीपीएमटीचा कोर्स तीन वर्षाचा असून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना 40 हजार रुपये फी भरावे लागत असल्याने अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कोर्सकरिता एससी,एसटी अल्पसंख्यांक यांना शिष्यवृत्ती दिली जाते. एसबीसी, एनटी,व्हीजेएनटी,ओबीसी मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही. आम्हालाही शिष्यवृत्ती मिळाविण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे निवेदनही दिले होते.

बातम्या आणखी आहेत...