आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातभट्टी दारूसह 5.64 लाखांचा मुद्देमाल जप्त:दोन आरोपींवर गुन्हा दाखल; सोलापूरमधील घटना

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारु विरोधात मोहीम राबवली जात आहे. गुरुवारी रात्री मुळेगाव तांड्यावरून निघालेल्या जीपचा पाठलाग करुन एक हजार दोनशे साठ लिटर हातभट्टी दारुचा साठ्यासह ५.६४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीचे १८ डिसेंबर मतदान होणार आहे. तरी निवडणुक पारदर्शक व शांततेत पार पाडावी याकरता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू, ताडी विरुद्ध कडक मोहीम राबवण्यात येत आहे. तसेच धाब्यावर दारु पिण्याची व्यवस्था करुन देणारे तसेच तेथे बसून दारू पिणाऱ्यांवरही विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे भरारी पथकाने मुळेगाव तांडा रोडवर पाळत ठेवली, मुळेगाव तांड्यातून एक जीप क्रमांक( एमएच-०६ डब्ल्यू-६८३७ ) ही भरधाव वेगाने बोरामणीकडे जात असतांना दिसून आली. या वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता जीपचालकाने भरधाव वेगाने जीप पळवून लावण्याचा प्रयत्न केला. पथकाने जीपचा सिनेस्टाईल पाठलाग करुन सोलापूर-हैद्राबाद रोड वरील मुळेगाव तांड्याच्या हद्दीतील डाळ मिल समोरील रोडवर विभागाला ही जीप पकडण्यात यश आले.

जीपची झडती घेतली असता त्यात वाहनचालक धर्मराज अंकुश माने व भगवान देविदास निकम (दोघेही राहणार- बक्षी हिप्परगा ता. दक्षिण सोलापूर) बसलेले आढळून आले. दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन जीपमधील त्यांच्या ताब्यातील १४ रबरी ट्यूबमध्ये भरलेली एक हजार दोनशे साठ लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वाहनासह एकूण पाच लाख चौसष्ट हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...