आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुना विडी घरकुल परिसरातील तीन एटीएम न फोडताच अतिशय सफाईदारपणे त्यातून सुमारे सहा लाख रुपये चोरले आहेत. दोन महिन्यांपासून सुरू असलेला प्रकार हा काल उघडकीस आला. त्यानंतर हिताची पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे किरण संजय लांडगे यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली.
हिताची कंपनीकडून एटीएम मशीन चालवली जातात. हिरामोती टॉवर सोनी नगर येथील मशीनमधून दहा हजार, शिंदे शाळा योगेश्वरनगर, जुना विडी घरकुल येथील मशीनमधून २ लाख ६९ हजार, जुना विडी घरकुल, हैदराबाद रोड परिसरातील मशीनमधून तीन लाख २० हजार २०० रुपये असे एकूण पाच लाख ९९ हजार २०० रुपये चोरीस गेले आहेत. हा प्रकार १५ ऑक्टोंबर ते १८ डिसेंबर २०२२ दरम्यान घडला आहे.
सहायक पोलिस निरीक्षक वैजनाथ कुकडे तपास करत आहेत. याबाबत त्यांना विचारले असता, एटीएम मशीन फोडून अथवा एटीएम कार्डची अदलाबदल करून हे पैसे पळवले नाहीत. प्राथमिक माहितीनुसार एटीएमच्या लाॅकरचे कोड माहिती असलेल्याने त्याचा वापर करून पैसे काढून घेतल्याचा संशय आहे. पण अद्याप ठोस असे काहीही सांगता येणार नाही. तांत्रिक दृष्टीने या घटनेचा तपास सुरू आहे. याची अजून पडताळणी सुरू आहे. लवकरच गुन्ह्याचा छडा लागेल असे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.