आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामानात अनपेक्षित बदलाने कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढला:1 लाख 62 हजार हेक्टवरील पिकांना 618 कोटींचे विमा संरक्षण

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवामानात अनपेक्षित बदलाने कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. एवढ्या संकटावर मात करूनही हातातोंडाशी आलेले पीक नैसर्गिक आपत्तीमुळे वाया जातात. त्यामुळे कृषी विभागातर्फे राबवण्यात आलेल्या पिक-विमा योजनेत जिल्ह्यातील 1 लाख 95 हजार 583 अर्जदार शेतकऱ्यांनी 12.56 कोटींचा विमा हप्ता भरून एक लाख 62 हजार 335 संकटावर पिकांना 618.46 कोटींचे विमा संरक्षण घेतले आहे.

असमतोल पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांच्या जोपासणेत अडचणी येतात. यंदा जून महिन्यात सुरवातीला पाऊस झाला. त्यानंतर हुलकावणी दिलेल्या पावसाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. पिकांची वाढ खुंटल्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मेहनतीने जोपासलेले पीक काढणी वेळी अतिवृष्टीत हिरावले जाते. नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमान योजनांतर्गत खरीप पीक विमा भरला आहे. पिकांना विम्याचे संरक्षण देण्यासाठी एक ऑगस्ट शेवटचा दिवस होता.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी देण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती, हवामानातील अनपेक्षित बदल, अतिप्रमाणात सरासरीपेक्षा दीड पटीने पडणारा पाऊस, कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे खरीप पिकांना बसणारा फटका लक्षात घेता शेतकऱ्यांनी पीक विम्याचे संरक्षण मिळवले आहे. यापूर्वी ज्वारी, बाजरी, मक, उडीद, मूग, भुईमूग, तूर, सोयाबीन, सुर्यफुल, कापूस, कांदा, ऊस आदी पिकांसाठी विमा उतरवला आहे.

ओल्या दुष्काळासह अतिवृष्टीची भीती

जिल्ह्यातील मागील दोन वर्षांपासून पीक काढण्याच्या वेळी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे भविष्यातील अतिवृष्टीच्या संकटाचा विचार करून यापूर्वी जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरून पीक संरक्षित केले आहे. विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी 31 जुलै शेवटची तारीख होती. पण, रविवार शासकीय सुट्टीचा वार असल्याने 1 ऑगस्ट हा एक दिवसाचा वाढीव वेळ मिळाला.

जिल्ह्यातील संरक्षित खरीप क्षेत्र...

  • एकूण अर्जदार शेतकरी : 1, 95, 583
  • पीक विमान संरक्षित क्षेत्र : 1, 62,335हेक्टर
  • शेतकऱ्यांचा जमा विमा हप्ता : 12.56 कोटी
  • विमा संरक्षित रक्कम : 618.46 कोटी
  • एकूण विमा : 119.77
बातम्या आणखी आहेत...