आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविजापूर रोडवरील ठोकळ प्रशालेच्या मुलांना शिक्षकांनी विमान सफर घडवून आणला आहे. चेन्नई ते बेंगलोर व बेंगलोर ते हैदराबाद ( रामोजी फिल्म सिटी) हा विमान प्रवास केला. सर्वांच्या दृष्टीने अविस्मरणीय क्षण म्हणायला हरकत नाही. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी आनंदासोबत वेगवेगळ्या गोष्टींची माहितीही संकलित केल्याचे म्हटले आहे.
शैक्षणिक सहली शालेय, महाविदयालयीन इ. स्तरांवर तसेच विशिष्ट शैक्षणिक प्रकल्पाचा भाग म्हणूनही काढल्या जातात. मानवाने प्राचीन काळापासून स्वदेशातील अज्ञात प्रदेश तसेच परदेशांतील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याच्या उद्दिष्टांनी मनमुराद, स्वैर भटकंती केली जाते. ही भटकंती काहीजण बसे तर काही रेल्वेद्वारेही करतात. मात्र ठोकळ प्रशालेच्या मुलांची पाच दिवसाची सहलीमध्ये रेल्वेबरोबर विमानाचा प्रवास ही घडून आणला आहे. विद्यार्थ्यांना विविध गोष्टी, ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे, संग्रालये आदींची माहिती एकत्रित करुन एक अहवाल ही शाळेत जमा केला जातो.
इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेची 2022-23 ची शैक्षणिक सहल चक्क विमानाने आयोजित केली आहे. दक्षिण भारतातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी, कांचीपुरम, महाबलीपुरम, तसेच चेन्नई ते बेंगलोर व बेंगलोर ते हैदराबाद ( रामोजी फिल्म सिटी) येथे विमानाने सहलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच भारतातील विविधता, कला, शैक्षणिक, सांस्कृतिक भौगोलिक व ऐतिहासिक गोष्टींची सखोल व प्रात्यक्षिक भेटीद्वारे माहिती प्राप्त करून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील उपक्रमशील व गुणवत्तेसाठी नावाजलेली श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेमार्फत शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीचे आयोजन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडूनही पैसे घेण्यात आलेले आहेत.
या सहलीमध्ये प्रशालेतील 62 विद्यार्थी -विद्यार्थिनी, प्रशालेतील चार शिक्षक व तीन शिक्षिका असे एकूण 69 जन यामध्ये सहभागी झाले. सहशिक्षक युसुफ शेख सहशिक्षिका मंगल कारंडे, वैशाली पाटील, पुनम पाटील, सहशिक्षक सुरज पवार, बाबासाहेब पवार व आनंद ढगे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीचे नियोजन करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.