आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदान:जिल्ह्यातील 2 हजार 679 शेतकऱ्यांना 62 कोटींचे अनुदान; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी मिळणार लाभ, फळबाग लागवड योजना अंमलबजावणीत सोलापूर राज्यात प्रथम

शासनाने कृषी विभागाकडे सर्व योजनांची अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टलद्वारे एक अर्ज अनेक योजना सुविधा अंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात मार्चअखेर २ हजार ६७९ शेतकऱ्यांना ६२.२६ कोटी अनुदानाचे वाटप केलेले आहे. यामध्ये ठिबक सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, कांदा चाळ, शेततळे, अस्तरीकरण, शेडनेट हाऊस, पाइप, बियाणे आदींचा लाभ दिला आहे. सोलापूर जिल्हा राज्यामध्ये योजना अंमलबजावणीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

नियोजन भवन याठिकाणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा खरीप हंगाम नियोजनासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, तूर, मूग, मळा आदी पिकांच्या बियाणांची मागणी आहे. सोयाबीन बियाणाची येणारी अडचण लक्षात घेता शेतकऱ्यांना घरातील बियाणे वापरासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांकडे ६४६३४ क्विंटल आणि उन्हाळी हंगामातील ९ हजार क्विंटल असे एकूण ७३ हजार ६३४ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असून बियाण्याची कमतरता भासणार नाही, त्यानुसार नियोजन केले आहे. जिल्ह्यात रासायनिक खतांचा सरासरी वापर २.१२ मे.टन आहे. त्यानुसार आज अखेर जिल्ह्यात ९५३०५ मे.टन खत उपलब्ध झाले आहे. त्यातील ३१३२३ मे. टनाची विक्री तर ६३९८२ मे.टन खत बाजारात उपलब्ध आहेत.

गैरप्रकारावर कारवाई
रासायनिक खतांचा वापर संतुलित व्हावा यासाठी शेतकऱ्यांना हिरवळीची खते, पाचट कुजवणे, जैविक खतांचा वापर, कृषक अॅपच्या माध्यमातून खत वापर बाबत माहिती देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार खत पुरवठा व्हावा, यासाठी भरारी पथकाकडून तपासणी, गैरप्रकार आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. कृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

बातम्या आणखी आहेत...