आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील निवडणूक लागलेल्या १७ ग्रामपंचायतींपैकी दर्गनहळ्ळी ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली, तर २५ सदस्य बिनविरोध झाले. आता १६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ६२ तर सदस्यासाठी ४३७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचाचे ५२ व सदस्यांचे २६७ जणांनी उमेदवारी माघार घेतली, अशी माहिती तहसीलदार अमोल कुंभार यांनी दिली.
सर्वात मोठ्या मंद्रूप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पाच जणांमध्ये पंचरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिता कोरे, भाजपकडून प्रभावती हेळकर, काँग्रेस, शिवसेनेच्या शीतल राठोड तर मीनाक्षी टेळे व निर्मला देशमुख या अपक्ष म्हणून नणंद भावजय असे रिंगणात आहेत. सदस्याच्या १७ जागेसाठी एकूण ६६ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. सरपंच पदासाठी अनेक गावांमध्ये तिरंगी व चौरंगी लढत होत आहे.
कंदलगावमध्ये तिरंगी, विंचूर व औजमध्ये चौरंगी, आहेरवाडी व धोत्रीमध्ये पंचरंगी लढत होत आहे. निंबर्गी ग्रामपंचायतीसाठी काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे यांचे चिरंजीव श्रीदीप हसापुरे यांच्या विरुद्ध भाजपचे चन्नाप्पा बोरगी अशी सरळ लढत होत आहे. येथे रमेश हसापुरे यांनी आपली उमेदवारी माघार घेऊन पुतण्या श्रीदीप यास पाठिंबा दिला. सुरेश हसापुरे, अरुण बिराजदार व गंगाधर बिराजदार पॅनेलच्या उमेदवारांसाठी ठाण मांडून होते. भाजपचीही धावपळ सुरू होती. विंचूरच्या सरपंच पदासाठी चौरंगी लढत होत आहे. प्रभाग दोनमधून ब्रह्मदेव साबळे यांना बिनविरोध करण्यासाठी पाटील-पुजारी व साबळे गटामध्ये तीन वाजेपर्यंत वादावादी सुरू होती. होनमुर्गी व वांगीत सरपंच पदासाठी दुरंगी सामना रंगणार आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी आज नार्थकोट प्रशालेत मोठी गर्दी झाली होती. उमेदवार बिनविरोध करण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू होती. तर काहीजण अर्ज माघार घेण्यासाठी इच्छुकांची मनधरणी करीत होते.
ग्रामपंचायतनिहाय बिनविरोध सदस्य विंचूर- ब्रह्मदेव साबळे, लतिका साबळे, प्रियंका घाडगे, निंबर्गी -भाग्यश्री कोळी, होनमुर्गी- धर्मराज रामपुरे, मुबारक निंबाळे, परमेश्वर वाघमारे व अनिता हडपद, आचेगाव - गौतमी गोतसुर्वे, मंगल गोतसुर्वे, शांताबाई शिलेणी व जयश्री खांडेकर, तोगराळी - कोंत्याव्वा बिराजदार व पार्वती शिंदे, औज (मंद्रूप) - नयना चौधरी,
सरपंचासाठी रिंगणातील उमेदवार मंद्रूप - अनिता कोरे, प्रभावती हेळकर, शीतल राठोड, मीनाक्षी टेळे व निर्मला देशमुख, विंचूर - बाळासाहेब पाटील आदित्य झाडबुके लक्ष्मीकांत बनगोंडे विष्णू साबळे, निंबर्गी -श्रीदीप हसापुरे व चन्नाप्पा बोरगे, कंदलगाव - बायडाबाई सलगरे, शारदाबाई कडते व धवलश्री निंगफोडे शंकरनगर - गजानन राठोड व सुभाष चव्हाण, बसवनगर - मोतीलाल राठोड, निखिल राठोड व पांडुरंग व्हनमाने, होनमुर्गी - सुभाष तेली व बसवराज स्वामी, वांगी - सोनाबाई खडाखडे, सीताबाई खडाखडे, औज (मंद्रूप) - मल्लिकार्जुन करके, अश्पाक जहागीरदार, इर्शाद काझी व अबूबकार पाटील, गंगेवाडी - जावेद शेख, अजिनाथ जाधव, प्रशांत जाधव, प्रवीण धोत्रे व प्रताप जाधव, आहेरवाडी - सुवर्णा दिंडोरे, योगिनाथ दिंडोरे, पंचपा धनशेट्टी, राजेशाह मकानदार व अयाज काझी, बंकलगी - प्रभाकर कापसे, किरण सुर्वे, चंद्राम सगरे व अप्पाण्णा कोणदे, आचेगाव - स्वाती पाटील, विश्रांती पाटील व कस्तुराबाई बहिर्जे, धोत्री - शशिकला बिराजदार, सोनाली दहिटणे, राणी व्हटकर, वैशाली पाटील व प्रभावती चौगुले, रामपूर - वीरपाक्ष घेरडे, हावण्णा सुतार व सिद्धाप्पा बगले, तोगराळी - महेश पाटील, दगडू मुगळे व दत्तात्रय तेलंग,
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.