आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टँकर घोटाळा:टँकरमधून वाहून गेले 7 कोटी; चौकशी सुरू तब्बल 7 वर्षांनी ; 8 मध्ये कमी खर्च

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतील टँकर घाेटाळ्यात गेल्या सात वर्षांत ७ काेटी ९३ लाख रुपये खर्च झाले. त्याची चाैकशी तब्बल ७ वर्षांनी सुरू केली. त्याच्या बिलांचे रेकाॅर्डच गायब असल्याने आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. २०१६ ते १८ या कालावधीत हा घाेटाळा झाला हाेता. या प्रकरणात एका विभागीय अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले.

उद्यान विभागातील रेकाॅर्ड गायब झाल्यानंतर टँकरचे रेकाॅर्ड गायब हाेण्याची महापालिकेतील ही दुसरी घटना आहे. उद्यान विभागातील रेकाॅर्डप्रकरणी पाेलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे. त्यानंतर आता टँकर लाॅबीच्या विराेधात गुन्हा दाखल हाेईल. आयुक्त श्री. शिवशंकर यांनीच ही माहिती दिली. गुन्हा दाखल करण्याचे आदेश विभागीय अधिकाऱ्यांनाच दिले. याबाबत सर्वच विभागीय अधिकाऱ्यांना चाैकशीचेही आदेश देण्यात आले. टँकर घाेटाळा थाेपवण्यासाठी प्रत्येक टँकरमागे जीपीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली हाेती. त्यानंतर आश्चर्यकारक टँकरची संख्या कमी झाली हाेती. तिथेच संशयाला जागा मिळाली आणि पुढील चाैकशी सुरू झाली.

बातम्या आणखी आहेत...