आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदी 7 हजार, तर साेने 2500 रुपयांनी स्वस्त:पितृ पंधरवड्यानंतर साेने खरेदीचा मुहूर्त दसऱ्याला, गौरी-गणपतीनिमित्त खरेदीला उधाण

श्रीनिवास दासरी | साेलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या १५ दिवसांतच साेने २ हजार ५०० तर चांदीच्या दरात ७ हजार रुपयांनी घसरण झाली. उत्सव काळातच बाजारातील या घडामाेडींनी खरेदीची सुवर्णसंधीच चालून आली. गाैरी-गणपतीला आभूषणे घेण्याच्या निमित्तानेही खरेदीला उधाण आल्याचे पहायला मिळत आहे.

अनंत चतुर्दशीनंतर लगेच पितृ पंधरवड्याला सुरुवात हाेईल. त्या पंधरा दिवसांच्या कालावधीत नवीन काही खरेदी हाेणार नाही. त्यानंतर साेने खरेदीचा मुहूर्त थेट ५ ऑक्टाेबरला दसऱ्याच्या दिवशीच आहे. त्यामुळे ग्राहकांची पावले सुवर्णपेढ्यांकडे वळली. पूर्व मंगळवार पेठेतील सराफ बाजारासह माेठी दालने ग्राहकांनी फुलून गेली. गाैरींच्या स्वागताला साेन्याच्या दागिन्यांची खरेदी हाेऊ लागली. चांदीच्या वस्तूंनाही मागणी आली. यंदाच्या गाैरी-गणपतीच्या आरासमध्ये साेन्या-चांदीची आभूषणेही दिसून येतील.

पक्ष पंधरवडा संपला की साेन्याच्या दरात वाढ हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी ५५ हजार रुपये एक ताेळा (१० ग्रॅम) या दराने साेने विकले गेले. यंदा त्याहूनही पुढे जाण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे गणेशाेत्सव काळातच साेन्या-चांदीची ही खरेदी सुरू झाली.

साेन्यातली गुंतवणूक साेन्यासारखीच : अभिषेक शिरसीकर, गुंतवणूक सल्लागार, साेलापूर

साेनेदरातील घसरणीला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामाेडींचे कारण आहे. जसे - अमेरिकन फेडरल बँकेने व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले. तैवान-चीन या दाेन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. अशा गाेष्टींमुळे भांडवली बाजार आणि साेनेबाजारावर परिणाम हाेताे. साेन्याच्या दरात घसरण हाेते. या निमित्ताने साेने खरेदीची सुवर्णसंधी असते. साेन्यातील गुंतवणूक साेन्यासारखीच असते. कुठल्याही गरजेला लगेच आणि अधिक परतावा देणारी. खरेदी करताना ग्राहकांनी एवढेच लक्षात घ्यावे की, दागिन्यांपेक्षा बिस्किटांना अधिक प्राधान्य द्यावे. कारण बहुतांश दागिने २४ कॅरेटचे नसतात.

सोने : ५३ हजारांवरून ५१ हजार
(प्रतिकिलोचा हा दर आहे)

१३ ऑगस्ट : ५३ हजार २०० १६ ऑगस्ट : ५२ हजार ५०० २२ ऑगस्ट : ५१ हजार ९०० ३१ ऑगस्ट : ५१ हजार ३०० ०१ सप्टेंबर : ५० हजार ९०० ०२ सप्टेंबर : ५१ हजार रुपये

१३ ऑगस्ट : ६१ हजार ५०० १६ ऑगस्ट : ६० हजार रुपये २२ ऑगस्ट : ५७ हजार ५०० ३१ ऑगस्ट : ५५ हजार ५०० ०१ सप्टेंबर : ५४ हजार ५०० ०२ सप्टेंबर : ५५ हजार रुपये

बातम्या आणखी आहेत...