आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप हंगाम:जुलैत सरासरीपेक्षा 71 मि.मी. जास्त ; जिल्ह्यात सरासरीच्या 123 टक्के पावसाची नोंद

सोलापूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जून महिन्यात सरासरी पावसाच्या फक्त ८४ टक्के पाऊस खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. पण जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीचा टक्का वाढला शिवाय पाणीसाठ्यातही वाढ झाली. जुलै महिन्यात सरासरी पावसाच्या सव्वापट पाऊस झाला आहे. शासन दरबारी झालेल्या नोंदीनुसार जून महिन्यात १०२ मि.मी. अपेक्षित असताना ८७ मि.मी. तर जुलै महिन्यात ९४ मि.मी. अपेक्षित असताना १५६ मि. मी. पाऊस झाला आहे. जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. दक्षिण सोलापूर, माळशिरस व करमाळा वगळता इतर तालुक्यांत सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस होता. पण जुलै महिन्यात सर्वच तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात २१३ टक्के, बार्शी तालुक्यात २०० टक्के, अक्कलकोट तालुक्यात १७७ टक्के तर करमाळा तालुक्यात १७४ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंतचा सर्वात कमी ७३.६० टक्के पाऊस सांगोला तालुक्यात झाला आहे तर सर्वाधिक १४६ टक्के पाऊस बार्शी तालुक्यात झाला आहे.जूनमध्ये अपेक्षित पाऊस झाला नसल्याने खरीप पिके संकटात आली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. जुलैच्या पावसाने समाधान दिले आहे.

पुणे विभागाचीही जुलैतील पावसाची टक्केवारी वाढली
पुणे जिल्ह्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे व सोलापूर या पाच जिल्ह्यांत आतापर्यंत ४३३ मि.मी. ८२.४० टक्के पाऊस झाला आहे. जून महिन्यात ८४.९० मि.मी. ४२.७० टक्के जुलै महिन्यात ३४८.४० मि.मी. १०६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसाने सरासरी १०० टक्केहून जास्त झाली आहे. मागील वर्षी ११५.६० टक्के पाऊस झाला होता. जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीच्या ८४ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळ‌े शेतकरी चिंतेत होते.

बातम्या आणखी आहेत...