आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात करण्यात येणाऱ्या विकासकामांची यादी महापालिकेमार्फत जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी खा. डाॅ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी १०.९८ कोटींच्या कामाची यादी दिली. आमदार विजयकुमार देशमुख यांनी १७.६५ कोटी, आमदार सुभाष देशमुख यांनी १०.९८ कोटी तर आमदार प्रणिती शिंदे यांनी १५.५० कोटींच्या कामाची यादी दिली आहे. त्यानुसार कामाचे पूर्वगणपत्रक महापालिकेने तयार केले आहे. यासाठी महापालिका अधिकारी तीन दिवसांपासून काम करत होते. याअगोदर महापालिकेने ३८ कोटींची यादी सादर केली होती. त्यात दुरुस्ती करत ७४ कोटीची यादी तयार करण्यात आली आहे.
महापालिकेच्या वतीने जिल्हा नियोजन समितीकडे जिल्हास्तरीय नगरोत्थान योजना कामासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश देण्यात आले होते. निधी वाटपावरुन काँग्रेस व भाजपात आरोप- प्रत्यारोप झाले. समान निधी वाटप करावे, अशी भूमिका आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली. त्यानुसार पुन्हा कामाची यादी तयार केली. यादी दुरूस्त करण्यात आली आहे. आता काय निर्णय होणार याकडे लक्ष आहे.
लोकप्रतिनिधींनी पुन्हा कामे वाढवली मागील सरकारने यापूर्वी मंजूर झालेली कामे रद्द केली हाेती. त्यानंतर पुन्हा नव्याने यादी तयार करण्यात आली. मतदार संघात जास्त कामे व्हावी म्हणून आमदारांकडे आलेल्या अर्जानुसार त्यांनी यादी तयार करून पालिका प्रशासनाकडे सादर केली आहे.
नियोजन समितीकडे २५ कोटी निधी देण्याची तरतूद जिल्हा नियोजन समितीकडून शहरासाठी २० ते २५ कोटींच्या निधीची तरतूद केली जाते. प्रस्ताव ७४ कोटींवर गेल्याने त्यावर पालकमंत्री काय निर्णय घेतात ते बैठकीनंतर कळेल.
मागील आठवड्यात यादी पाठवली मागील आठ दिवसांपूर्वी यादी तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे. त्यावर जिल्हा नियोजन समिती बैठकीत निर्णय होईल.'' शीतल तेली-उगले, महापालिका आयुक्त.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.