आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा आधुनिक यंत्रांच्या आयातीवर ७.५ टक्के सीमा शुल्क आकारण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी अंदाजपत्रक मांडताना जाहीर केला. त्याला देशभरातील यंत्रमाग घटकांनी विराेध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिल्लीत बैठक झाली. परंतु त्यातून ताेडगा निघालेला नाही. सीमा शुल्कामुळे आधुनिक यंत्रमाग महागतील. सामान्य कारखानदारांच्या गुंतवणूक क्षमतेच्या पलीकडचे त्याचे बजेट हाेईल, असे साेलापूर यंत्रमागधारक संघाने म्हटले आहे. आधुनिक यंत्रांच्या आयातीवर सीमा शुल्क वाढवल्यास आधुनिकीकरणाला खीळ बसेल.
साेलापुरात आधुनिक ‘रॅपिअर लूम’ आले, परंतु त्यांचे प्रमाण फारच कमी. त्यांची संख्या वाढवण्यासाठी ‘टेक्स्टाइल अपग्रेडेशन फंड’ (टफ) ही याेजना आहे. त्यानुसार वस्त्राेद्याेगासाठी लागणाऱ्या आधुनिक यंत्रसामग्रीवर सीमा शुल्क माफ आहे. परंतु बुधवारच्या अर्थसंकल्पात सरसकट ७.५ टक्के सीमा शुल्काची घाेषणा करताना त्यातून वस्त्राेद्याेग घटक वगळलेला नाही. पूर्वीप्रमाणे सीमा शुल्कमाफी असावी, अशी मागणी इचलकरंजी, मालेगावसह साेलापूरच्या यंत्रमागधारकांनी केली. राज्याच्या वस्त्राेद्याेग धाेरण समितीचे सदस्य पेंटप्पा गड्डम यांनी ही माहिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.