आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात १२ सरपंच पदासाठी ७८ अर्ज, तर १२४ सदस्य पदासाठी ४६९ अर्ज वैध ठरले. उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जाची छाननी करण्यात आली. छाननीत डोणगावचे मावळते सरपंच संजय भोसले यांच्याबाबत हरकत फेटाळण्यात आली. तर मार्डी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनुसूचित जमातीमधून दाखल झालेला अर्ज अवैध ठरवल्यामुळे तेथील दुसरा उमेदवार बिनविरोध निवडला जाणार आहे.
सोमवारी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात १२ गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेल्या सरपंच व सदस्य पदाच्या अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये डोणागावचे मावळचे सरपंच संजय भोसले यांनी सदस्य पदासाठी दाखल केलेल्या अर्जावर हरकत घेण्यात आली होती. भोसले यांना तीन अपत्य असल्याने त्यांचा अर्ज रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली होती.
मात्र याबाबत तक्रारदाराने पुरावा सादर न केल्यामुळे हा अर्ज निकाली काढण्यात आला. मार्डी ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातून दाखल झालेल्या हरिद्वार काळे यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. यामुळे या प्रवर्गात भानुदास काळे यांचा एकमेव अर्ज राहिला आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ढिसाळ कारभाराचे पुन्हा दर्शन
उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाचा ढिसाळ कारभार परत एकदा समोर आला. रात्री आठ वाजेपर्यंत छाननीमधून किती अर्ज वैध ठरले याची माहिती उपलब्ध झाली नाही. याबाबत प्रशासनाला विचारणा केली असता काही उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज सादर केले असून, त्यांची छाननी सुरू असल्याची माहिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.