आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​ग्रामपंचायत निवडणुका:उत्तर तालुक्यातील 12 गावांमध्ये सरपंच 78, सदस्यसाठी 470 अर्ज

उत्तर सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बारा गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी ७८ अर्ज दाखल झाले तर सदस्य पदांसाठी ४७० अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. प्रशासनाने ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची मुभा दिल्याने इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करत तहसील कार्यालयात अर्ज दाखल केले.

शुक्रवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी तहसील कार्यालयाचा आवार गजबजून गेला. यामध्ये महिला वर्गांचा मोठा सहभाग दिसून आला. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे की ते गावातून शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आले. गावडीदारफळ ग्रामपंचायत मधून अर्ज दाखल करताना उमेदवारांसोबत मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. रानमसले ग्रामपंचायतीसाठी चार गटांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. अकोलेकाटी येथूनही तीन गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले. गावडी दारफळ, पाकणी, डोणगाव येथून दुरंगी लढती हाेतील. प्रशासनाने सायंकाळी साडेपाचपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत ठेवल्यामुळे उशिरापर्यंत तहसील कार्यालयात गर्दी होती.

दक्षिणमध्ये १७ सरपंच पदासाठी १२१, सदस्यत्वासाठी ६३७ अर्ज

मंद्रूपसाठी इच्छुकांची रांग दक्षिण सोलापूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी १२१ तर सदस्यांसाठी एकूण ६३७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंद्रूप ग्रामपंचायतीसाठी इच्छुकांची रांग लागली होती.

भाजपकडून मंद्रूप सरपंच पदासाठी प्रभावती हेळकर यांनी समर्थकांसह अर्ज भरला. यावेळी माजी सभापती गुरुसिध्द म्हेत्रे, हेमंतकुमार स्वामी, मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, सूर्यकांत ख्याडे उपस्थित होते. काँग्रेसचे मोतीलाल राठोड यांच्या पॅनलकडून शीतल राठोड यांनी सरपंचसाठी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरला. तसेच राष्ट्रवादीनेही अर्ज भरले.

निंबर्गीत काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांचे चिरंजीव श्रीदीप हसापुरे यांनी समर्थकांसह अर्ज भरला. आहेरवाडीतही मोठ्या संख्येने अर्ज भरण्यात आले. काही गावांमध्ये दोन, तीन, चार पॅनल झाले आहेत. ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यास वेळ लागत असल्याने ऑफलाइन अर्ज भरण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली.

बातम्या आणखी आहेत...