आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणीत कमी डांबर:8 निकृष्ट रस्ते नव्याने करण्याचे आदेश ; पाच मक्तेदारास नोटीस देणार

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील ३१ पैकी ८ रस्ते निकृष्ट आढळून आल्याने संबंधित मक्तेदारांना ते रस्ते नव्याने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले असून या प्रकरणी संबंधित ५ मक्तेदारांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

सध्या शहरातील रस्त्याचा विषय चर्चेत आहे. तक्रारीनंतर महापालिकेने ३१ रस्त्यांची तपासणी केली. त्यापैकी १८ रस्ते संशयित आढळले. यातील १० रस्ते तिसऱ्या चाचणीत दुरुस्त करून करण्यात आले. अन्य ८ रस्ते निकृष्ट असून, ते पुन्हा नव्याने करण्यात येणार आहे. यासाठी ५ मक्तेदारास नोटीस देण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक २, ९, २२, २३, २४ मधील रस्ते आहेत.

शहरातील रस्ते अत्यंत खराब झाले असून ते नव्याने करा, अशी मागणी करत माजी आमदार दिलीप माने यांनी नुकतेच आंदोलन केले. दरम्यान, केलेले रस्ते योग्य आहेत का यांची तपासणी पालिका प्रशासन करत आहे. ३१ रस्त्यांची ७, १५ व २८ दिवसांच्या अंतराने तपासणी करण्यात आली. ७ व १५ दिवसांच्या तपासणीत १८ रस्त्यांच्या चाचणीत ते योग्य नसल्याचे निदर्शनास आले. पुन्हा २८ दिवसांची तपासणी केली. त्यातील १० रस्त्यात योग्य प्रमाणात जाडी नसल्याचे दिसून आले. अन्य ८ रस्ते योग्य नसून, ते पुन्हा नव्याने करावे लागणार आहे. तीन महिन्यापूर्वीच हे रस्ते करण्यात आलेले आहेत.

५ मक्तेदारांनी केले ८ रस्ते : ८ निकृष्ट रस्ते करणारे ५ मक्तेदार आहेत. त्यांना नोटीस देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून पुन्हा कामे करून घेण्यात येणार आहे. नाही केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

नव्याने रस्ते करावे लागतील
३१ रस्त्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ८ रस्ते निकृष्ट असून, त्याचे काम ५ मक्तेदारांनी केले आहे. त्यांना नाेटीस देणार आहे. त्यांनी पुन्हा नव्याने काम करावे. अन्यथा आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार.''
पी. शिवशंकर, पालिका आयुक्त

बातम्या आणखी आहेत...