आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज लोकार्पण:रक्तदानासाठी रेडक्राॅसकडून दमाणीला रु.८० लाखांची बस;रक्तसंकलनासाठी सुसज्ज व्यवस्था

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन रेडक्रॉस सोसायटी सोलापूर शाखा संचालित दमाणी रक्तसंकलन केंद्रात नवीन मोबाइल बस दाखल झाली आहे. या गाडीत रक्त संकलन करण्यासाठी सुसज्ज व्यवस्था आहे. पाच खुर्च्या कम बेड, ५ माॅनिटर्स, रक्त साठवण्यासाठी फ्रीज, विद्युतपुरवठा खंडित झाल्यास यूपीएस प्रणाली या बसमध्ये आहे. ही बस ८० लाख रुपयांची असून इंडियन रेडक्रॉस सोसायटीने सोलापूर शाखेस भेट दिली आहे. या बसचा लोकार्पण सोहळा रविवारी सकाळी ९ वाजता चार हुतात्मा चौकात होईल.

दमाणी रक्तपेढीच्या वतीने थॅलिसिमिया आजार असलेल्या बालकांना मोफत रक्तघटक पुरवण्यात येतात. गरजू आणि वंचित अशा २०० मुलांची नोंदणी रक्त संकलन केंद्राकडे आहे. त्यांना दरमहा दाखल करून घेऊन आवश्यक तो रक्त घटक तातडीने पुरवला जातो. त्याची सोय डफरीन चौकातील रक्तपेढीत आहे. दमाणी रक्तपेढीच्या सामाजिक बांधिलकीमुळे अनेक रक्तदाते स्वेच्छेने रक्त देण्यासाठी पेढीत येतात. सामान्य रुग्णांना तातडीने रक्त देण्याची व्यवस्था रक्तपेढीत आहे. दात्यांना सुविधा देण्याबरोबरच रक्तदान चळवळ रूजेल यासाठी प्रयत्न सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून एकाच वेळी पाच जणांना रक्तदान करता येईल अशी बस घेतली.

मोबाइल व्हॅन यासाठी गरजेची
नव्या मोबाइल व्हॅनमुळे शिबीरस्थळी जाऊन संकलन करणे सुकर होणार आहे. दात्यांच्या वाढदिवसाला घरापर्यंत जाऊन रक्तदानाचा कौटुंबिक सोहळा करता येईल, या दृष्टीने ही मोबाइल बस गरजेचीच होती. या बसचा शुभारंभ २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी होणार आहे, असे डाॅ. राजीव प्रधान यांनी सांगितले.

रेल्वे स्टेशन, मंत्री चंडक पार्क, रूपाभवानी रोडवरून बस फिरणार
शनिवारी सकाळी लोकार्पण सोहळा झाल्यानंतर ही बस सकाळी दहा ते साडेदहा या वेळेत शनिमंदिर रेल्वे स्टेशन, १०.४५ ते ११.३० पर्यंत नाथ रिजेन्सी रूपाभवानी रोड व ११.४५ ते १२.१५ या वेळेत मंत्री चंडक पार्क विजापूर रोड येथे फिरेल. पत्रकार परिषदेला डॉ. राजीव प्रधान, जयेश पटेल, खुशाल देढीया, विजय उपाध्ये, अशोक नावरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...