आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण:जिल्ह्यात वीज बिल थकबाकीत 80 टक्के वाटा पथदिव्यांचाच, जिल्ह्याच्या 591 कोटी थकबाकीपैकी 474 कोटी पथदिव्यांच्या वीज बिलाची

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज बिलाची थकबाकी वसुलीसाठी महावितरणने परिश्रम घेतले. मार्चअखेरीस सोलापूर जिल्ह्यावर ५९१ कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी राहिली आहे. यामध्ये ४७४ कोटी रुपयांची थकबाकी पथदिव्यांच्या वीज बिलाची आहे. शहरावरील थकबाकी मार्च अखेरीस ७ कोटी ८६ लाख रुपयांची राहिली आहे. ७ पैकी ३ कोटी रुपयांची थकबाकी ए उपविभागीय कार्यालयाकडे आहे.

महावितरणचे शहरातील काम पाच उपविभागीय कार्यालयांत विभागले गेले आहे. या पाच उपविभागीय कार्यालयांमार्फत वसुली केली जात आहे. शहरातील ४७ हजार ९५६ ग्राहकांकडे ७ कोटी ८६ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये पथदिव्यांचे ६७ हजार, पाणीपुरवठ्याचे ३९ हजार, सार्वजनिक सेवेत २४ लाख ८ हजार, इतर मध्ये २१ हजार रुपयांची थकबाकी राहिली आहे. पाच उपविभागीय कार्यालयांत ए कडे ३ कोटी १६ लाख, बी - ४० लाख, सी - १ कोटी २७ लाख, डी - १ कोटी ९२ लाख, इ - १ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी आहे. उपविभागीय कार्यालयाकडे रूपाभवानी मंदिर, बाळीवेस, सम्राट चौक, बुधवार पेठ, एसटी स्टॅन्ड आदी परिसर येतो. या भागातील थकबाकी वसूल का होत नाही, महावितरणकडून कारवाई का करत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्याची स्थिती
जिल्ह्यात घरगुती, व्यापारी, औद्योगिक वीज ग्राहकांची २९ कोटी १२ लाख रुपयांची थकबाकी राहिली आहे. पथदिवे ४७४ कोटी ८० लाख, पाणीपुरवठा ८५ कोटी ३१ लाख, सार्वजनिक सेवा १ कोटी ९८ लाख आणि इतर ७६ लाख रुपये असे एकूण ५९१ कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यातील थकबाकीचे आकडे पाहता शासकीय यंत्रणांवरच कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याचे दिसून येत आहे. शेतीपंपाची मूळ थकबाकी ३५५३ कोटी रुपये आहे. कृषी पंप वीज धोरण २०२० या योजनेत ३१ मार्च २०२२ पर्यंत थकबाकी भरल्यास पन्नास टक्के माफी मिळत होती. आता मार्च २०२३ पर्यंत भरल्यास तीस टक्के आणि मार्च २०२४ पर्यंत थकबाकी भरल्यास २० टक्के माफी मिळणार आहे. थकबाकीदारांचा विद्युत पुरवठा खंडित करू नये असे शासनाने सांगताच थकबाकी भरण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...