आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुरस:माढा 82.95  टक्के मतदान; शिंदे गटाविरोधात सावंतांमध्ये चुरस

माढा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीसाठी शांततेत सरासरी ८२.९५ टक्के मतदान झाले. माढा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले. दारफळ, घाटणे, भोसरे,चिंचोली या ग्रामपंचायतीत चुरशीने मतदान झाले. चिंचोलीत सर्वाधिक ९७.०५ टक्के तर सर्वात कमी मतदान ७५.८८ भोसरे ग्रामपंचायतीत झाले.७७.२६ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला असून ८८.४१ टक्के पुरुषांनी मतदान केले.

ग्रामपंचायत निहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : दारफळ ८४.३५, शिंगेवाडी ८६.३५, घाटणे ८७.७३, चिंचोली ९७.०५, भेंड ८५.०९, चोभेपिंपरी ८२.३१, रोपळे खुर्द ८६.२, भोसरे ७५.८८. बार्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक श्याम बुवा यांनी मतदान केद्रांची पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...