आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:निराधार योजनेचे 8.51 कोटी परत गेले; लाभार्थींच्या खात्यांतून तीन महिने पैसे काढले गेले नाहीत

सोलापूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय गांधी निराधार योजनेतील २०१७ ते २०२१ मधील ८ कोटी ५१ लाख रुपये सरकारला परत पाठवण्यात आले. बँक खात्यातील चुका, नावातील चुका, मृत लाभार्थी व खात्यावर रक्कम तीन महिन्यांहून अधिक काळ उचलण्यात आली नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. किती खात्यांवर ही रक्कम होती ? ती खाती बंद करण्यात आली आहेत का ? याची उत्तरे प्रशासनाकडे नाहीत. विशेष म्हणजे यामध्ये सोलापूर शहर व दक्षिण सोलापूर तालुक्यात निम्म्याहून अधिक म्हणजेच ५ कोटी ३६ लाख रुपये शासनाला परत पाठविण्यात आले आहेत.

लाभार्थींची संख्याच नाही : तीन महिन्यांत ज्या लाभार्थींनी रकमा काढली नाही, अशा खात्यांवरील रक्कम मोठी दिसून आली. संजय गांधी योजना कार्यालयाकडे पैसे न काढलेल्या खात्याची संख्या असणे अपेक्षित असताना तशा खात्यांची संख्या नाही. उत्तर सोलापूर, शहर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगोला व मोहोळ तालुक्यात अशी रक्कम मोठ्या प्रमाणात जमा झाली आहे.

तालुकावार रक्कम
उत्तर सोलापूर १.२६ कोटी, शहर सोलापूर, ३.२७ कोटी, दक्षिण सोलापूर २.०९ कोटी, बार्शी १०.०७ लाख, माढा २२.६९ हजार, माळशिरस ४.२३ लाख, मंगळवेढा ४१ हजार ८००, मोहोळ ८१.७३ लाख, पंढरपूर ७.११ लाख, सांगोला ६२.८९ लाख, एकूण ८.५१ कोटी.

प्रशासनाने चौकशी करावी : ज्या लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्यात आलेली रक्कम तीन महिन्यांहून अधिक काळ काढली नाही, त्या प्रत्येक खात्याची सखोल चौकशी करावी. खरोखरच नावात वा बँक खात्यात त्रुटी होत्या का ? लाभार्थी मृत झाले आहेत का ? लाभार्थीच बोगस आहेत याची चौकशी केल्यास सत्य समोर येईल. मागील पाच वर्षात शासनाकडे पाठविलेली साडेआठ कोटींची ही रक्कम खूप मोठी आहे.

लाभार्थींची नेमकी संख्या देण्यासाठी बँकांना पत्र
तीन महिन्यांहून अधिक काळ रक्कम उचलली नाही, अशा खात्यांची संख्या व रकमेची माहिती देण्यासाठी बँक अधिकाऱ्यांना पत्रे देण्यात आली आहेत. पण बँकांनी खात्यावरील रकमेची माहिती दिली. खात्यांचीही संख्या देण्याबाबत पुन्हा पत्र देण्यात आले आहे. पैसे न काढलेली खाती बंद करण्याची सूचना तहसीलदारांना दिली आहे.''
अंजली मरोड, तहसीलदार संजय गांधी योजना

बातम्या आणखी आहेत...