आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील वेदंत्री व्हेंचर एलएलपी कंपनीने गुंतवणूकदारांची ८६ लाख, ७० हजारांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी कंपनीच्या मालकासह तिघांवर गुन्हा दाखल केला असून, त्यातील दोघांना अटक केली आहे. संतोष दत्तू गुरव (रा. कोथळे, ता. माळशिरस) विजय वसंत क्षीरसागर (रा. कोथळे, ता. माळशिरस) सचिन गेनु फुले (रा. मोरोची, ता. माळशिरस) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यातील संतोष गुरव आणि विजय क्षीरसागर त्यांना २ जानेवारीला अटक झाली आहे. न्यायालयाने त्यांची ७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
नातेपुते येथील वेदत्री व्हेंचर एलएलपी कंपनीने गुंतवणुकीसाठी आमिष दाखवले. रकमेचा मोठया प्रमाणात परतावा देण्याचे आश्वासन दिले. मात्र फिर्यादी तसेच इतर साक्षीदारांच्या ठेवींची नोटरी कराराप्रमाणे परतफेड केली नाही. काही परतावा, लाभांश देवून उर्वरित परतावा, लाभांश व गुंतवणूक केलेली ठेवीची रक्कम दिली नाही. कंपनीने गुंतवणूकदारांची ८६ लाख, ७० हजार, ७९८ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
भूलथापांपासून सावध, पोलिसांना कळवा ज्या नागरिकांनी वेदत्री व्हेंचर एलएलपी कंपनीत गुंतवणुक केली आहे. व ज्यांची फसवणुक झाली आहे अशा गुंतवणुकदारांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अकलुज येथे संपर्क साधावा. अशा आकर्षक लाभ देणाऱ्या योजनेपासून लोकांनी सावध राहावे. भुलथापांना बळी पडू नये. असा प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.