आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​परवड:विद्यापीठात 87 कंत्राटी, जिल्ह्यात 400 पेक्षा जास्त सीएचबी प्राध्यापक ; विद्यार्थ्यांचे होतात हाल

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील जटिल बनलेला प्रश्न म्हणजे नियमित प्राध्यापक भरती. गेल्या १२ ते १५ वर्षांपासून ती बंदच आहे. परिणामी कंत्राटी प्राध्यापकांची भरती हाच उपाय विद्यापीठासमोर आहे. विद्यापीठ फंड तोकडा असल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील एक कंत्राटी प्राध्यापकास अवघे १८ हजार ते २२ हजार रुपये इतकेच वेतन मिळते. तब्बल ८७ जागांवर कंत्राटी प्राध्यापक नेमले जात आहेत. नियमित प्राध्यापकांना दीड ते दोन लाख पगार मिळतो.

एक नियमित प्राध्यापक निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी दोन सीएचबी प्राध्यापकांना सेवेत घेता येते. पण वेतन साडेचारशे रुपये एका घड्याळी तासाला मिळते. तेही आठवड्यातून नऊ तासांपेक्षा जास्त तास ज्ञानदान करता येत नाही. म्हणजे एका सीएचबी प्राध्यापकाला वेतन मिळते अवघे १४ ते १५ हजार प्रति महिना. तेही सुटीच्या कालावधीत पगार नाही. आता सीएचबी प्राध्यापकांनी फक्त एकाच महाविद्यालयात तासिका घ्याव्यात असेही बंधनकारक आहे.

सीएचबी व कंत्राटी पद्धत बंदच करावी, थेट एमपीएससीद्वारे प्राध्यापकांची व्हावी भरती
सीएचबी असो वा कंत्राटी प्राध्यापक. उच्च शिक्षणातील ही पद्धत बंद करून १०० टक्के जागांवर नियमित प्राध्यापकांची भरती करावी. गेल्या १५ वर्षांपासून सीएचबी प्राध्यापक तुटपुंज्या वेतनावर कार्य करीत आहेत. एमपीएससीमार्फत नियमित प्राध्यापकांची भरती व्हावी, जेणेकरून यात पारदर्शकता येईल. सध्या राज्य स्थापित महाविद्यालयांमध्ये एमपीएसएसी द्वारे प्राध्यापक भरती होते. हीच पद्धत नव्या नियमित प्राध्यापक भरतीमध्ये राबविता येेईल. तुटपंुज्या वेतनामुळे सीएचबी प्राध्यापकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. वेतन कमी, नोकरीची शाश्वतीही नाही. सीएचबी पद्धत पूर्ण करावी. उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी सीएचबी, कंत्राटी प्राध्यापकांचा प्रश्न शासनाने मार्गी लावावा. ''
प्रा. शिवानंद घाेंगडे, साेलापूर, सीएचबी प्राध्यापक

विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापकांच्या वेतनाचा प्रश्न लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही निश्चित होईल. विद्यापीठ फंडातून हे वेतन होत असते. वेतन वाढविण्याचा प्रश्नी योग्य ताे तोडगा काढण्यासाठी निश्चित प्रयत्न राहील. विविध अभ्यासक्रमांची फी साठी शासन शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. त्याद्वारेही प्रश्न मार्गी लागू शकतो.'' डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू

बातम्या आणखी आहेत...