आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेकॉर्डमध्ये नोंद:95 मायएफएमवरील लग्नाची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला नोंद; अनोखा विवाह सोहळा

सोलापूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतिहासात प्रथमच ९५ मायएफच्या स्टुडिओमध्ये २२ जून रोजी दुपारी १२.२० वाजता ऑन एअर विवाह सोहळा पार पडला. कित्येक दिवसांपासून ज्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती असा अनोखा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक विवाह सोहळ्यात रेडिओच्या माध्यमातून समस्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील श्रोत्यांनी अक्षता टाकल्या. याची गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली.

९५ मायएफएमच्या वतीने ‘शादी ऑन एअर’ या अनोख्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नितीश पाखरे आणि सायली अबनावे या दांपत्याचा विवाह सोहळा पार पडला. केवळ रेडिओच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात या विवाहाची नोंद होऊन “गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ चा किताब जाहीर झाला. २१ जून रोजी सायंकाळी मेंदी आणि हळदीचा कार्यक्रम पार पडला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ जून रोजी अक्षता सोहळा झाला.

विवाह सोहळ्याचे अपडेट्स आणि अक्षता सोहळा ९५ मायएफएम ट्यून इन करून प्रत्येक श्रोत्यांनी अनुभवला. असा आगळ्या वेगळ्या पद्धतीने विवाहसोहळा झाल्याबद्दलवर आणि वधूने आनंद व्यक्त केला. या उपक्रमाचे अॅक्टिव्हिटी पार्टनर स्पाइस अॅण्ड आइस इव्हेंट्स होते. या विवाह सोहळ्याचे सर्व अपडेट्स आणि फोटो कोणाला पहायचे असतील तर त्यांनी मायआरजे श्रद्धा आणि मायआरजे अमृत यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवर पहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...