आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुत्र्याला वाचवणे पडले महागात:कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्नात 17 वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून जागीच मृत्यू, माढ्यातील घटना

माढाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रस्त्यात कु्त्रा आडवा आल्याने ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले

रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने 17 वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. माढा येथे ही दुर्देवी घटना घडली. संग्राम निवास कदम असे मुलाचे नाव आहे. तो घरून ट्रॅक्टर घेऊन जात असताना हा अपघात घडला.

संग्राम नुकताच दहावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. घरासमोर लावलेला ट्रॅक्टर घेऊन चालवत असताना रस्त्यावर त्याला कुत्रा आडवा आला. कुत्र्याला वाचवण्यासाठी तो गोंधळला आणि ट्रॅक्टवरचे नियंत्रण सुटले. यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडा झुडपात घसरत जाऊन पलटी झाला. यादरम्यान संग्राम ट्रॅक्टरखाली चिरडला गेला. जेसीबीच्या सहाय्याने त्याला बाजुला काढण्यात आले. माढा ग्रामीण रुग्णालयात त्यास आणले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

संग्राम आणि त्याच्या कुटुंबियांना काल दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहनांची पूजा केली होती.
संग्राम आणि त्याच्या कुटुंबियांना काल दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहनांची पूजा केली होती.

मुलाचा मृत्यु झाल्याचे समजताच आई वडिलांसह नातेवाइकांनी आक्रोश केला. माढा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन प्रकिया सुरु आहे. संग्रामच्या पश्चात आई, वडील, एक बहीण, आजोबा, असा परिवार आहे. माढा पोलिसांत मृत्युची नोंद करण्यात आली.