आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माढा:22 वर्षीय विवाहितेची तीन वर्षाच्या चिमुकल्यासमोर राहत्या घरी आत्महत्या, कारण अस्पष्ट

माढा (संदीप शिंदे)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्षा यांनी 6 जानेवारीला राहत्या घरातील छताला ओढणी बांधून गळफास घेतला.

निमगाव(मा) गावातील 22 वर्षीय विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वर्षा चंद्रकात ओहोळ असे त्या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. 6 जानेवारी रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपासातून ते उघड होणार आहे.

माढा ग्रामीण रुग्णालयात वर्षा यांचा मृतदेह बुधवारी रात्रीच आणण्यात आला. गुरुवारी सकाळी 10 पर्यंत तरी शवविच्छेदन करण्यात आलेले नव्हते. निमगाव(मा)गावच्या हद्दीत असलेल्या महावितरणच्या सबस्टेशन शेजारी वर्षा या पतीसह राहत होत्या. पती चंद्रकात हे ट्रॅक्टर चालक म्हणुन काम करत आहेत.

वर्षा यांनी 6 जानेवारीला राहत्या घरातील छताला ओढणी बांधून गळफास घेतला. वर्षा याचे सासर निंमगाव तर माहेर पांगरी(ता.बार्शी) हे होते. लग्न झाल्यापासूनच माहेरीच पत्नी वर्षा बरोबर चंद्रकात राहत असायचे. नोकरीच्या शोधात ते पुणे जिल्ह्यात गेले होते. नुकत्याच काही महिन्यांपुर्वी चंद्रकात हे वर्षाला घेऊन आपल्या गावी निमगावात राहायला आले होते. ऊस वाहतुक टॅक्टरचा चालक म्हणून ते कामही करत होते. अशातच वर्षा यांनी गळफास घेऊन जीवन संपवले आहे.

पती पत्नीच्या किरकोळ वादातून रागाच्याभरात वर्षा यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे. नेमके कारण पोलिस तपासातून उघड होईल. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे हे करत आहेत. माढा पोलिसांत दगुड ओहोळ यांनी फिर्याद दिल्यानुसार मृत्युची नोंद झाली आहे.

तीन वर्षाच्या मुलाचा टाहो, त्यानंतर घटना उघड
आपल्या आईचा आवाज अचानक बंद झाल्याने तीन वर्षाच्या चिमुकल्याने टाहो फोडला. मुलाचा रडण्याचा आवाज शेजारच्या दगडु ओहोळ यांना आला. ओहोळ यांनी घराकडे धाव घेऊन आवाज देखील दिला मात्र दार उघडले नाही. नंतर दरवाजा उघडून पाहिले असता वर्षा यांनी वास्याला गळफास घेतल्याचे दिसले.

बातम्या आणखी आहेत...